Pankja Munde:’शिवशक्ती परिक्रमा यात्रा हाणून पाडण्याचा डाव’, पंकजा मुंडेंचा स्फोटक दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Pankaja Munde Parikrma yatra beed ah, ahmednagar
Pankaja Munde Parikrma yatra beed ah, ahmednagar
social share
google news

Pankja Munde: भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा अहमदनगरनंतर बीड जिल्ह्यात आणल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधताना आपल्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेविषयी (Shivshkti Parikrma Yatra) सांगताना त्यांनी जनतेच्या अमाप प्रेम व्यक्त करत त्यांनी आपल्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेविषयी काही लोकं कशी असूया बाळगून आहेत हे सांगताना विरोधकांबरोबरच त्यांनी अंतर्गत असलेल्या विरोधकांवरही निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी आपली ही परिक्रमा यात्रा हाणून पडण्याचा डाव होऊ शकतो असा इशारा देत मला सगळ्या माणसांना सोबत घेऊन काम करायचे आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

गडूळ राजकारणात तुरटीचं काम

पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचा साडेतीन हजार किलो मीटर प्रवास पूर्ण होत तो आता पाच हजार किलोमीटरकडे जात आहे. या परिक्रमा यात्रेच्यानिमित्ताने पंकजा ताई यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसात मी राजकारणात ब्रेक घेतला. त्यामुळे आता पुन्हा एकदा जोमाने मला काम करायचे आहे. त्यासाठीच ही परिक्रमा यात्रा काढत त्यांनी मला आता सध्याच्या परिस्थितीत गडूळ झालेल्या राजकारणात तुरटीचं काम करण्याची इच्छा असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हे ही वाचा >> Kopardi Rape Case : कोपर्डी प्रकरणातील मुख्य आरोपीची येरवडा कारागृहातच आत्महत्या

बातम्या छापतील, बॅनर लावतील

परिक्रमा यात्रेच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी आपल्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा दमदार एन्ट्री या यात्रेच्या निमित्ताने केली आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सूचक इशारा देत आपले विरोधकांना यात्रेबद्दल असूया असून ते आता बातम्या छापतील, बॅनर लावतील तरीही आमच्या कार्यकर्त्यांनी आता शांत बसायचे आहे. डोक्यावर बर्फ ठेऊनच काम करायचे आहे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

हे वाचलं का?

तोल जाऊ दिला नाही

गेल्या काही दिवसांपासून राजकारण गडूळ झाले आहे. त्यामुळे आता मला या परिस्थितीत आणि गडूळ झालेल्या राजकारणात तुरटीचं काम करायचं आहे. त्याचवेळी मला इतक्या वेळा नाकारले असले तरी डोक्यावर बर्फ ठेऊन काम करायचे आहे. माझ्या कार्यकर्त्यांनीही तसेच काम करायचे आहे, त्यांचा तोलही जाऊ द्यायचा नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हे ही वाचा >> ‘इंडिया म्हटलं की काहींना खाज सुटते’, उद्धव ठाकरेंनी मोदींना डिवचलं, काय बोलले?

माझं शक्तीपीठ तुम्ही

परिक्रममा यात्रेच्या निमित्ताने मला लोकांना भेटता येतं. राजकारणात ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा यानिमित्ताने मला तुमच्या आशिर्वादाने काम करता येतं असं सांगत पंकजा मुंडे यांनी जनतेला भावनिक आवाहन केले. यावेळी त्यांनी जनतेला माझं शक्तीपीठ तुम्ही आहात. कारण सध्या माझ्याकडे कोणतंही पद नसतानाही तुम्ही मला एवढ्या मोठ्या उत्साहाने प्रतिसाद देत आहात त्यामुळे तुम्हीच माझं खऱ्या अर्थाने शक्तीपीठ असल्याचे मतही त्यांनी यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT