No Confidence Motion : सर्व रेकॉर्ड मोडून 2024 मध्ये परत येऊ; PM मोदींचा पलटवार

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

PM Modi Specch on No Confidence Motion : काँग्रेसचे गौरव गोगेईंनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले. मणिपूर हिंसाचार मुद्द्यावरून विरोधकांनी पंतप्रधान मोदींना घेरले. त्याला उत्तर देताना नरेंद्र मोदींनी विरोधकांना कोपरखळ्या लगावल्या.

अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधान मोदींचं उत्तर

– देशातील जनतेने आमच्या सरकारवर वारंवार विश्वास व्यक्त केला आहे.

– ईश्वर खूप दयाळू असतात, असे म्हणतात. ईश्वर कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून आपली इच्छा पूर्ण करत असतो. मी याला (अविश्वास ठराव) ईश्वराचा आशीर्वाद मानतो. ईश्वराने विरोधकांना सुचवलं आणि ते अविश्वास प्रस्ताव घेऊन आले. 2018 मध्येही ईश्वराचाच आदेश होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

-त्यावेळी मी म्हणालो होतो की, अविश्वास प्रस्ताव आमच्या सरकारची बहुमत चाचणी नाहीये. उलट ही त्यांची परीक्ष आहे. झालंही तसंच. मतदान झालं तेव्हा विरोधकांकडे जितकी मतं होती, तितकीही त्यांना गोळा करता आली नाही. आम्ही जनतेत गेलो, तेव्हा जनतेही यांच्यावर अविश्वास दाखवला. निवडणुकीत एनडीए आणि भाजपला जास्त जागा मिळाल्या. एकप्रकारे विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव आमच्यासाठी शुभ असतो.

– 2024 च्या निवडणुकीत एनडीए आणि भाजप जुने सर्व विक्रम तोडून भव्य विजयासह परत येईल.

ADVERTISEMENT

– गेल्या अधिवेशनात आणि या अधिवेशनात अनेक विधेयक मंजूर केली. विरोधी बाकांवरील काही पक्षांनी त्यांच्या आचरणातून हे सिद्ध केलं की, त्यांच्यासाठी देशाहून मोठा पक्ष आहे. त्यांची पहिली प्राथमिकता पक्ष आहे. त्यांना गरिबाच्या भूकेची चिंता नाहीये. सत्तेची भूक त्यांच्यावर डोक्यात स्वार झालेली आहे.

ADVERTISEMENT

देशातील तरुणांच्या भविष्याची चिंता नाहीये. त्यांच्या राजकारणाची चिंता आहे. फिल्डिंग विरोधकांनी लावली होती, पण षटकार-चौकार सत्ताधाऱ्यांनी लगावले. विरोधक अविश्वास प्रस्तावावर फक्त नो बॉल नो बॉल करतोय. इकडे शतकं होताहेत आणि ते नो बॉल म्हणताहेत. मी विरोधकांना इतकंच सांगेन की तुम्ही तयारी करून का येत नाही?

– थोडी मेहनत घ्या. मी तुम्हाला पाच वर्षे दिली. मी 2018 मध्ये म्हणालो होतो की, 2023 मध्ये या. पाच वर्षातही तुम्ही करू शकले नाही. काय अवस्था आहे. काय दारिद्रय आहे. देश तुम्हाला बघतोय. देश तुम्हाला ऐकतोय. पण, प्रत्येकवेळी तुम्ही देशाला निराशेशिवाय काहीच दिलं नाही.

– ज्यांचे स्वतःची खाते बिघडलेले आहेत. तेही आम्हाला हिशोब विचारताहेत. या अविश्वास प्रस्तावात काही गोष्टी खूपच विचित्र होत्या. सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याचे यादीत नावच नव्हते. 1999 वाजपेयी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आला. त्यावेळी शरद पवार नेतृत्व करत होते. त्यांनी चर्चेचं नेतृत्व केलं. 2003 अटलबिहारीचं सरकार होतं. सोनिया गांधी विरोधी नेत्या होत्या. त्यांनी अविश्वास प्रस्ताव आणला. 2018 मध्ये खरगेंनी विषय मांडला. पण, यावेळी अधीर रंजन चौधरींची काय अवस्था झाली. त्यांच्या पक्षाने त्यांना बोलण्याची संधीच दिली नाही. अमित शाह म्हटले की, हे चांगलं नाही. अध्यक्षांनी वेळ संपल्यानंतरही संधी दिली, पण ‘गुड का गोबर’ कसं करायचं, यात त्यांचं प्राविण्य आहे.

– काही लोक प्रयत्न करताहेत प्रतिमा मलीन व्हावी. पण, जगाने भारताला ओळखलं आहे. भारत कसं योगदान देऊ शकतो, याबद्दल जगाचा विश्वास वाढत चालला आहे. विरोधकांनी अविश्वासाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास तोडण्याचा प्रयत्न केला आहे.

-देशातील गरीबी घटतेय. नीति आयोगानुसार 13.50 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. आयएमएफने म्हटलं आहे की, भारताने अति गरिबी जवळपास संपवून टाकली आहे.

गेल्या तीन दिवसांत विरोधकांनी शब्दकोशातून आणि माहिती कुठून आणले, पण भरपूर अशब्द काढले. पण ठिक आहे. त्यांचं मन हलकं झालं असेल. तसंही हे लोक माझ्यावर दिवसरात्र टीका करत असतात. त्यांच्यासाठी सगळ्यात प्रिय घोषणा काय आहे, तर ‘मोदी तेरी कब्र खुदेगी’. माझ्यासाठी यांच्या शिव्या, अपशब्द, असंदीय भाषा याचं टॉनिक बनते.

– माझा यावर विश्वास बसलाय की, विरोधकांना एक गुप्त वरदान मिळालं आहे. हे लोक ज्याचं वाईट चिततात, त्याचं चांगलं होतं. एक उदाहरण तर मी आहे. 20 वर्षात काय झालं नाही. काय केलं गेलं नाही, पण माझं भलं होत गेलं. तीन उदाहरणातून मी या गुप्त वरदान सिद्ध करू शकतो.

– या लोकांनी म्हटलं होतं की, बँकिंग सेक्टर डुबणार. देश उद्ध्वस्त होईल. परदेशातील विद्वानांना घेऊन यायचे. अफवा पसरवल्या. पण, झालं काय, सार्वजनिक बँकांचा नफा दोन टक्क्यांनी जास्त झाला.
-फोन बँकिंग घोटाळ्याचा मुद्दा काढला. पण, एनपीए पार करून आता ते मोठ्या ताकदीने उभे आहे.

-गृहमंत्र्यांच्या प्रस्तावावर सहमत झाले असते, तर फक्त मणिपूर मुद्यावर चर्चा झाली असती. सगळ्या पैलूंवर चर्चा झाली असती आणि त्यांनाही खूप बोलण्याची संधी मिळाली असती. पण, त्यांना चर्चेत रस नव्हता. अमित शाहांनी काही बाबी मांडल्या.

-आम्ही म्हटलो होतो की, या आपण मणिपूरवर चर्चा करू. गृहमंत्र्यांनी पत्र पाठवलं होतं. त्यांच्या विभागाशी जोडलेला विषय होता. पण, इच्छा नव्हती. त्यांच्या पोटात दुखत होतं, पण डोकं आपटत होते. गृहमंत्र्यांनी मणिपूर मुद्दा सविस्तरपणे मांडला. सरकारची चिंताही त्यांनी मांडली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT