Chhagan Bhujbal:’तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही…’, भुजबळांनी थेट जरांगेंचं खाणंच काढलं!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

speaking at an obc public meeting in jalna chhagan bhujbal criticized manoj jarange patil on issue of reservation in very venomous words
speaking at an obc public meeting in jalna chhagan bhujbal criticized manoj jarange patil on issue of reservation in very venomous words
social share
google news

Chhagan Bhujbal vs Manoj jarange: जालना: ‘मी छगन भुजबळ दिवाळीत सुद्धा बेसन-भाकर ठेचा आणि कांदा फोडून खातो. पण स्व:कष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही.’ असं म्हणत मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर अत्यंत जहरी असा वार केला आहे. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आतापर्यंत अनेकदा भुजबळांवर निशाणा साधला होता. मात्र, आज जालन्यातील अंबडमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्यात भुजबळांनी जरांगेवर अत्यंत तुफान हल्ला चढवला. (speaking at an obc public meeting in jalna chhagan bhujbal criticized manoj jarange patil on issue of reservation in very venomous words)

ADVERTISEMENT

‘आरक्षण म्हणजे काय हे त्यांना कळणार नाही.. ते त्यांच्या डोक्याच्या पलीकडचं काम आहे.’ अशा बोचऱ्या शब्दात भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटलांवर टीकेची झोड उठवली.

ओबीसी मेळाव्यात जहरी शब्दात भुजबळांची जरांगेंवर टीका

‘आज हे तुमचे जे नवीन.. मराठा समाजाचे दैवत निर्माण झाले आहेत. देव झाले आहेत.. त्यांचं म्हणणं असं आहे की, धनगर, माळी, तेली हे मध्येच घुसले आहेत. लक्षात घ्या.. तुम्हाला कळलं पाहिजे अभ्यास.. त्यांना तर कळणार नाहीच त्यांच्या डोक्याच्या पलीकडचं काम आहे. तुम्हाला कळलं पाहिजे.’

हे वाचलं का?

‘मार्च 1994 साली ओबीसी आरक्षणाचा जीआर निघाला. हे काय आम्हाला असंच घुसवलं? म्हणे.. कोणाचं खातायं, कोणाचं खातायं.. काय तुझं खातो काय रे? कोर्टाने सांगितलं की, प्रत्येक राज्याने आयोग स्थापन करायचा आणि नंतरच ओबीसी आरक्षण द्यायचं.

हे ही वाचा>> ‘मराठा समाजावर तुम्ही…’, गोपिचंद पडळकरांचा नाव न घेता पवारांवर हल्लाबोल

‘आम्हाला आरक्षण घटनेनं दिलं. यांना काहीच माहीत नाही. हे सकाळी उठतात.. आणि आमची लेकरं-बाळं, आमची लेकरं-बाळं.. दोन शब्दच त्याला येतात आमची लेकरं-बाळं. मघाशी सांगितलं.. बाकीच्यांची लेकरं-बाळं नाहीत का? परत पुढे काय सांगतो.. छगन भुजबळ बेसन-भाकर खाऊन आला तुरूंगात..’

‘हो खाऊन आलो. मी छगन भुजबळ दिवाळीत सुद्धा बेसन-भाकर ठेचा आणि कांदा फोडून खातो. पण स्व:कष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही.’

‘दुसरं सांगतो तुम्हाला, हे आरक्षण म्हणजे गरीबी हटावचं कार्यक्रम नाही. आज 75 वर्ष झाली.. आमच्या दलित समाजाला घटनेनं आरक्षण दिलं. पण आजही झोपडपट्ट्यांमध्ये आमचा दलित बांधव राहतोय. ओबीसींची सुद्धा गरीबी कमी झाली नाही. हा गरीबी हटावचा कार्यक्रम नाही. जे वर्षानुवर्ष दबलेले आहेत, पिचलेले आहेत त्यांना वर आणायचं इतरांबरोबर त्यासाठी हे आरक्षण दिलेलं आहे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> ‘Maratha, OBC, OPEN, EWS…तू खातो तरी किती?’, जरांगेची नाव न घेता भुजबळांवर टीका

‘हे आरक्षण म्हणजे काय हे तर समजून घे.. पण आम्हाला पण पाहिजे.. आम्हाला पण पाहिजे..’

ADVERTISEMENT

‘एक लक्षात घ्या आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. 58 मोर्चे निघाले.. आम्ही विरोध केला? नाही… दुर्दैवाने सुप्रीम कोर्टात आरक्षण अडकलं. त्याचा अभ्यास करा, मार्ग काढा.. पण त्यावेळेला अशी कोणाची घरं जाळली नाहीत.’ असं शब्दात भुजबळांनी जरांगे-पाटलांचा समाचार घेतला.

आता छगन भुजबळांच्या या टीकेनंतर मनोज जरांगे-पाटील नेमकं काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT