Badlapur Thane School case : बदलापूरच्या घटनेवर राज ठाकरेंचं मोठं आवाहन, ''मनसैनिकांनो लक्ष असू द्या...''
Badlapur Thane School case : बदलापूरमधील चिमुरडींवर झालेल्या अत्याचार प्रकरणावर आता राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले ?
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
बदलापूरच्या घटनेवर राज ठाकरेंचा संताप
पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा?
राज ठाकरेचं मनसैनिकांना मोठं आवाहन
Raj Thackeray Reaction On Badlapur Thane School Case : बदलापुरमधील एका नामांकीत शाळेत दोन चिमुकलींसोबत लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण बदलापूरात (Badlapur School Case) संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत पोलिसांनी देखील कारवाई करण्यास उशीर केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच आज नागरीकांनी बंदलापूर बंदची हाक देत, रेल्वे मार्ग रोखून धरला होता. या आंदोलनाला आता 7 तास उलटून गेले आहेत. या सर्व घटनेवर राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) देखील या घटनेवर सतंप्त प्रतिक्रिया दिली आहे. (badlapur thane school case update raj thackeray reaction 2 nursery kids sexually assaulted school parents block rail blockade badlapur crime news)
ADVERTISEMENT
बदलापूरमधील चिमुरडींवर झालेल्या अत्याचार प्रकरणावर आता राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? असा सतंप्त सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा : Deepak Kesarkar : "लहान मुलांच्या प्रकरणात अधिक कारवाई...", बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरला आहे आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयांत तुमचं लक्ष असू द्या,असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले आहे.
हे वाचलं का?
गिरीश महाजनांचा आंदोलकांशी संवाद
सरकारच्या वतीने आंदोलकांशी बोलण्याशी संकटमोचक गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकात दाखल झाले होते. यावेळी आंदोलकांनी गिरीश महाजन यांच्यासमोरच आंदोलकांनी आरोपीच्या फाशी...फाशीची घोषणा देऊन रेल्वे स्थानक दणाणून सोडलं. तसेच गिरीश महाजन यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव काही शांत होत नाही. याउलट सतंप्त आंदोलक फाशी फाशीच्या घोषणा देत आहे.
हे ही वाचा : Badlapur Crime: बदलापूर अत्याचाराच्या घटनेची INSIDE स्टोरी, 'असा' होता संपूर्ण घटनाक्रम
गिरीश महाजन यांनी यावेळी कारवाई करताना पोलिसांकडून जी दिरंगाई झाली आहे. त्या पोलिसांना निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन देखील त्यांनी आंदोलकांना दिले आहे. तसेच शाळेचे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांना निलंबित केलं आहे. या भागातील पीआयला देखील निलंबित केले आहे. तसेच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, असे गिरीश महाजन यांनी आंदोलकांना सांगत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT