Balasaheb Thackeray: 'हिंदूंसाठी बाळासाहेब देवासारखे! 26 जानेवारीला भारतरत्नची घोषणा करा...', ठाकरे सेनेची PM मोदींकडे मागणी

मुंबई तक

Uddhav Sena demand for Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देऊन सन्मानित केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26 जानेवारीला याबाबत घोषणा केली पाहिजे,अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज गुरुवारी केलीय.

ADVERTISEMENT

Balasaheb Thackeray Birth Anniversery
Balasaheb Thackeray Birth Anniversery
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाळासाहेब ठाकरे जंयतीनिमित्त ठाकरे शिवसेनेने केली PM मोदींकडे मोठी मागणी

point

"बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या.."

point

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Balasaheb Thackeray Birth Anniversary  :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देऊन सन्मानित केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26 जानेवारीला याबाबत घोषणा केली पाहिजे,अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज गुरुवारी केलीय. राऊत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त म्हणाले, अयोध्येत राम मंदिर बांधण्यात आला आहे, यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचं महत्त्वाचं योगदान होतं. बाळासाहेब हिंदू आणि मराठी माणसासाठी देवासारखे आहेत. त्यांच्या प्रयत्नातून राम मंदिर बनलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न दिलं पाहिजे, अशी मागणी अनेक हिंदू संघटनांच्या वतीने केली जात आहे. म्हणून आम्ही मागणी करत आहोत की, पंतप्रधान मोदींनी 26 जानेवारीला बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची घोषणा करावी.

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखात एकनाथ शिंदेंना गद्दार म्हटलंय आणि मराठ्यांच्या पानीपतच्या तिसऱ्या लढाईच्या पराभवाशी त्यांची तुलना करण्यात आलीय. अमित शाहा महाराष्ट्रात आल्यावर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव अनेकदा घेत असतात, असंही या अग्रलेखात म्हटलं गेलंय. बाळासाहेबांनी उभी केलेली शिवसेने याच लोकांनी कमकुवत केली, असा आरोपही शाहांवर करण्यात आलाय.

हे ही वाचा >> Pimpri Chinchwad Crime News : लिफ्टमधल्या रक्ताच्या डागांमुळे हत्येचा कट उघड, प्रेयसीनेच केला घात

ज्याप्रकारे पानीपतच्या लढाईत काही लोकांनी सदाशिव राव भाऊसोबत गद्दारी केली होती, तशाच प्रकारे एकनाथ शिंदे यांच्यासारख्या गद्दारांना उभं केलं गेलं.गेल्या काही वर्षात देशातील अेक जाती-धर्माच्या लोकांनी आरक्षणाची मागणी केलीय. यामुळेही समाजाचं वातावरण खराब झालं आहे. आज महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देतोय. महाराष्ट्र लुटेरुंच्या हाताता गेला आहे. मराठी लोकांना जाती आणि उपजातीत विभागलं गेलं आहे. मराठी म्हणून जे लोक एकत्र होते, त्यांना आज धनगर, ओबीसी, माळी, वंजारी, दलित आणि मुसलमान बनवलं जात आहे. त्यामुळे या लोकांमध्ये आपापसात वादविवाद होत आहेत, असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

हे ही वाचा >> Walmik Karad : वाल्मिकला ज्या स्कॉर्पिओने CID ऑफिसला सोडलं, ती 30 तारखेला बीडमधूनच निघाली? CCTV ने खळबळ

हे वाचलं का?

    follow whatsapp