विनोद तावडे म्हणाले भाजपमध्ये परत या, एकनाथ खडसेंनी केलं मोठं विधान
Politics of Maharashtra: खडसे यांनी भाजपमध्ये परत यावं असं आवाहन विनोद तावडे यांनी केलं होतं. ज्यावर आता एकनाथ खडसे यांनी देखील मोठं विधान केलं आहे. पाहा खडसे नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT
Politics of Maharashtra: जळगाव: भाजपचे (BJP) राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी मुंबई Tak च्या ‘चावडी’वर (Mumbai Tak Chawdi) बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना थेट भाजपमध्ये येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, आता यावरच एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे. ‘ज्या पक्षात माझा इतका छळ झाला, अनेक चौकश्या लावण्यात आल्या. त्या पक्षात आता मी पुन्हा जाणार नाही..’ असं म्हणत खडसेंनी तावडेंची भाजप प्रवेशाची शक्यता जवळजवळ धुडकावून लावली. (bjp eknath khadse jalgaon bjp vinod tawde devendra fadnavis ncp)
ADVERTISEMENT
पाहा एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले:
विनोद तावडेंनी चावडीवर बोलताना म्हटलेलं की, खडसेंसारख्या नेत्याने भाजपमध्ये परत यावं. त्यावर मुंबई Tak शी जळगावमध्ये बोलताना खडसे म्हणाले की, ‘विनोद तावडे आणि आम्ही गेले अनेक वर्षे भारतीय जनता पार्टीचे काम करत होतो. भाजपमध्ये विनोद तावडेंचे योगदान खूप आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना वाटत असावे की जुन्या लोकांनी पक्षात यावे. कर्नाटकचा पराभवावरून त्यांना असे वाटले असावे की जुन्या नेत्यांनी पक्षात परत यावे.’
‘मात्र, ज्या पक्षासाठी मी इतकं काही केलं. 2014 पासून माझा ज्या पक्षात छळ झाला. अनेक चौकशी लावण्यात आल्या त्या पक्षात आता मी पुन्हा जाणार नाही. भाजपमध्ये ज्यांच्यावर मोठे-मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते पक्षात येऊन स्वच्छ झाले. अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मला विधानपरिषद सदस्य बनवून राजकीय विजनवासातून बाहेर काढले. त्यामुळे आता भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही.’ अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
‘एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपमध्ये यावं’
‘ज्या प्रकारे माझी मैत्री असते, संबंध असतात.. तर सगळ्या पक्षातील दु:खी हे माझ्याशी बोलतात. त्याला काही अडचण नसते. केवळ भाजपचेच नाही.. सगळे एकत्र प्रवास करतो.. तेव्हा बोलतात आमच्या पक्षात असं आहे.. ते शेअरिंग असतं. असंही त्यातलं असतं..’
हे ही वाचा >> हनिमूनच्या रोमान्सवेळी झाला कहर, नवरा-नवरीचा बेडवरच गेला जीव!
‘ज्याच्यावर अन्याय असतो त्यांच्याकडे पेशन्स असले पाहिले. उदाहरण.. विलासराव देशमुख.. विधानपरिषदेला भाजपने मदत केलेली.. शिवसेनेने मदत केली असती तर ते विधानपरिषदेवर निवडून आले असते. अँटी काँग्रेस म्हणून निवडून पण पडले. पण झाले ना मुख्यमंत्री 2004 ला..’ असं विनोद तावडे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
‘मला असं वाटतं की, नाथाभाऊंनी परत आलं पाहिजे. पक्षात अशाप्रकारच्या लीडरशीपची गरज आहेच. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकांनी येणं.. पण नुसतं येताना नाथाभाऊ ज्या स्पष्टपणे बोलतात तसं अपेक्षित नसेल. पण जी-जी माणसं पक्षात आली पाहिजे असं आम्हाला वाटतं त्यात नाथाभाऊ आहेत.’ असं म्हणत तावडेंनी एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं पण त्यांनी शांत राहावं असंही यावेळी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> मेलेल्या आईच्या टाळूवरचा लोणी खाणारा लालची मुलगा, 6 वर्ष राहिला ‘तिच्या’ मृतदेहासोबत अन्…
खडसेंची फडणवीसांविरोधात स्पष्ट नाराजी
राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून खडसे आणि त्यांच्यात विस्तव जात नव्हता. अशातच भोसरी एमआयडीसी जमीन प्रकरणात खडसेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आपल्याला नाहक या प्रकरणात अडकवलं गेलं. असं खडसे वारंवार म्हणत होते. मंत्रिपद गेल्यानंतर खडसेंनी फडणवीसांवर तर थेट आरोपच केले होते. आपली नाराजी देखील त्यांनी वरिष्ठाकडे बोलून दाखवली होती. मात्र, तरीही त्याचा फार काही परिणाम झाला नव्हता. ज्यानंतर राज्यातील भाजपचं संपूर्ण नेतृत्व हे फडणवीसांकडेच सोपविण्यात आलं होतं. त्यामुळे 2019 विधानसभा निवडणुकीनंतर खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
ADVERTISEMENT