Budget 2025 Income Tax: 12 लाखांपर्यंतच्या कमाईवर शून्य कर... मोठी कर सवलत, पाहा Tax स्लॅब
New Income Tax Slab: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात प्रचंड मोठी घोषणा केली आहे. ज्यामध्ये त्यांनी 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त असेल असं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा

12 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर नाही

24 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 30 टक्के कर
Income Tax Budget 2025 Latest Updates: नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा करत म्हटले आहे की, आता 12 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरण्याची गरज नाही. नवीन कर प्रणाली अंतर्गत हा बदल करण्यात आला आहे. पूर्वी 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कोणताही कर नव्हता. तर मानक वजावट (Standard Deduction) 75,0000 रुपये ठेवण्यात आलं आहे.
आता 24 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जाईल. 75 हजार रुपयांपर्यंतच्या Standard Deduction साठी सूट असेल. तसेच, 15 ते 20 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 20% कर लागेल. तर 8-12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10% आयकर असेल.
हे ही वाचा>> UPI ID Updates: यूपीआय यूजर्ससाठी मोठी बातमी! 'या' अक्षरांची UPI आयडी 1 फेब्रुवारीपासून होणार ब्लॉक, NPCI ने बदलला नियम
बदलानंतर Tax slabs (Income Tax Budget 2025 News)
- 0-4 लाख - NIL or zero
- 4-8 लाख - 5%
- 8-12 लाख - 10%
- 12-16 लाख - 15%
- 16-20 लाख - 20%
- 20-25 लाख: 25%
- 25 लाखांपेक्षा जास्त - 30%
12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर शून्य कर (Income Tax Budget 2025 News)
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या या मोठ्या घोषणेनंतर मध्यमवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असेल तर त्याला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही. पण जर ते 12 लाख रुपयांपेक्षा असेल तर कर भरावा लागेल.
हे ही वाचा>> Budget 2025 LIVE: मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा.. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पादरम्यान मोठी घोषणा केली आणि १२ लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही अशी घोषणा केली. Standard Deduction 75,000 रुपये ठेवण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत 12 लाख 75 हजार रुपयांवर कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा अर्थ असा की ज्यांचे वार्षिक उत्पन्न 12 लाख 75 हजार रुपये आहे त्यांना एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.
गेल्या वर्षीही मिळालेली कर सवलत (Income Tax Budget 2025 News)
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 2024 च्या अर्थसंकल्पात, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी Standard Deduction ची मर्यादा वाढवून नवीन कर व्यवस्थेत मोठी भेट दिली होती. ही मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75 हजार रुपये करण्यात आली. आता पुन्हा एकदा मध्यमवर्गाला भेट देण्यासाठी नवीन Tax स्लॅबमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.
जुन्या Tax स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही (Income Tax Budget 2025 News)
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जुन्या Tax स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. जुन्या Tax स्लॅबमध्ये, पूर्वीप्रमाणेच, 5 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरण्याची आवश्यकता नाही. तसेच 50 हजार रुपयांचे Standard Deduction देखील आहे.
जुनी कर व्यवस्था (Tax Regim) Tax स्लॅब (Income Tax Budget 2025 News)
- 0 ते 2.5 लाख रुपयांच्या उत्पन्नासाठी: 0 %
- 2.5 लाख ते 5 लाख रुपयांच्या उत्पन्नावर: 5 %
- 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न: 20 %
- 10 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न: 30 %