"...याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना", बजेट घोषित केल्यानंतर CM फडणवीस काय म्हणाले?

मुंबई तक

CM Devendra Fadnavis On Union Budget 2025 : "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांचे मी मनापासून आभार मानतो. मध्यमवर्गासाठी एक ड्रीम बजेट त्यांनी दिलं आहे. इनकॅम टॅक्सची लिमिट 7 लाखांपासून 12 लाखांपर्यंत नेली आहे.

ADVERTISEMENT

CM Devendra Fadnavis On Union Budget 2025
CM Devendra Fadnavis On Union Budget 2025
social share
google news

बातम्या हायलाइट

point

12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स नाही

point

केंद्राच्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांना कोणता फायदा होणार?

point

CM देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पाबाबत दिली मोठी प्रतिक्रिया

CM Devendra Fadnavis On Union Budget 2025 : "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांचे मी मनापासून आभार मानतो. मध्यमवर्गासाठी एक ड्रीम बजेट त्यांनी दिलं आहे. इनकॅम टॅक्सची लिमिट 7 लाखांपासून 12 लाखांपर्यंत नेली आहे. त्यामुळे 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही. अशी जी इनकम टॅक्सची रचना करण्यात आली आहे, याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना, नोकरदारांना, नवतरुणांना याठिकाणी होणार आहे. यामुळे मोठं डिस्पोजेबल इनकम मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे. ते इनकम खर्च केल्यामुळे देशात मागणी म्हणजेच डिमांड मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यातून रोजगार निर्मितीही होणार आहे. या अर्थसंकल्पात अतिशय बोल्ड स्टेप्स अशाप्रकारचा निर्णय भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल", अशी मोठी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प घोषित केल्यानंतर पत्रकार परिषदेत दिली.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "शेती क्षेत्रात शंभर जिल्हे आयडेन्टीफाय करून त्यामध्ये शेती विकासाची मोठी योजना राबवण्याचा निर्णय असेल किंवा नवीन पल्सेस मिशन असेल. पहिल्यांदा केंद्र सरकारने घोषणा केली आहे की, तेलबीयांच्या संदर्भात जी काही व्हॅल्यू चेन तयार होईल, त्यामध्ये केंद्र सरकार शंभर टक्के खरेदी केंद्र सरकार करणार आहे आणि हमी भावाने करणार आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळण्याकरिता, अधिक पैसे मिळण्यासाठी त्याचा एक मोठा फायदा होणार आहे. मासेमारी करणाऱ्यांसाठी क्रेडिट लिमिट 3 लाखांपर्यंत होती ती 5 लाखांपर्यंत बिनव्याजी करण्यात आली आहे. याचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल. शेती क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची गुंतवणूक देखील सरकारने घोषित केलेली आहे". 

हे ही वाचा >>  Union Budget 2025: काय स्वस्त, काय महाग... बजेटमधून नेमकं काय मिळणार?

महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालं आहे आणि स्टार्टअपमधून सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होते आहे. त्या स्टार्टअपसाठी 20 कोटी रुपयांपर्यंत जी काही क्रेडिट लिमिट तयार करण्यात आली आहे, याचा आमच्या नवतरुणांना आणि स्टार्टअप्सला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात नवीन इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन तयार करण्यात आलेली आहे. विशेषत: पीपीपी प्रकल्पांसाठी जी नवीन योजना घोषित करण्यात आली आहे, यामुळे खासगी क्षेत्राची गुंतवणूक इन्फ्रास्टक्चरच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यातून रोजगाराची निर्मिती होईल, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा >> Budget 2025 Income Tax: 12 लाखांपर्यंतच्या कमाईवर शून्य कर... मोठी कर सवलत, पाहा Tax स्लॅब

हे वाचलं का?

    follow whatsapp