"प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेवर काही लोकांनी टीका केली, पण...", CM देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना स्पष्टच सांगितलं
Cm Devendra Fadnavis On PM Kisan Samman Yojana : वर्षाला पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे मिळतील, असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

"शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यात जाणारा पैसा..."

CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Cm Devendra Fadnavis On PM Kisan Samman Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 19 वा हफ्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खात्यात जमा करणार आहेत. मोदींनी ज्यावेळी किसान सन्मान योजना सुरु केली, त्यावेळी काही लोकांनी टीका केली. पण आज शेतकऱ्याच्या अडी अडचणीच्या काळात या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यात जाणारा पैसा अडी अडचणीला त्याला कामी येतो. मला या गोष्टीचा आनंद आहे की, महाराष्ट्रात त्यालाच अनुसरून नमो किसान योजना सुरु केली. मोदीजींच्या 6 हजार रुपयांबरोबर महाराष्ट्र सरकार देखील 6 हजार रुपये देतं. 3 हजार रुपयांची आणखी वाढ त्यात करणार आहोत. म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे मिळतील, असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 19 वा हफ्ता निधी वितरण सोहळ्यात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस जनतेला संबोधीत करताना म्हणाले, "'काही शेतकऱ्यांचा सत्कार देखील केलेला आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पण मला या गोष्टीचं अतिशय मनापासून समाधान आहे. मागच्या काळात ज्यावेळी मी मुख्यमंत्री झालो, त्यावेळी एकूणच मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्याची परिस्थिती पाहता, काही महत्त्वाचे निर्णय आपण त्या काळात घेतले. जलयुक्त शिवार सारखी योजना आणली. त्या योजनेच्या अंतर्गत जल संधारणाचं काम केलं".
हे ही वाचा >> Sushma Andhare : "सत्ताधाऱ्यांना खुश करून राज्यसभा मिळवायची..." अंधारेंकडून नीलम गोऱ्हेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा
"बळीराजा जल संजीवनी योजना केंद्र सरकारकडून मंजूर करून आणली. 25 हजार कोटी रुपये विदर्भातील अडकलेल्या प्रकल्पांवर खर्च करून 89 प्रकल्प पूर्ण केले. त्याचसोबत स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आपण आणली. ज्या योजनेत पहिल्या टप्प्यात आपण पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा कव्हर केला. दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण विदर्भ आणि मराठवाडा आपण कव्हर करतोय. या योजनेच्या अंतर्गत कृषी अवजारे, जलसंधारणाचं काम असेल, शेततळे असतील, सर्व अनुदान पद्धतीने आणि लक्षांक न ठेवता एका गावात गेलं की त्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सगळ्या योजनांचा लाभ द्यायचा", असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.