Beed: "जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत..." वाल्मिक कराडवर आरोपपत्र दाखल होताच धनंजय देशमुखांची मोठी प्रतिक्रिया

मुंबई तक

Dhananjay Deshmukh Press Conference : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी महत्त्वाची अपडे समोर आली आहे. सीआयडीने आरोपी वाल्किम कराडविरोधात 1400 पानी आरोपपत्र दाखल केलं आहे.

ADVERTISEMENT

Dhananjay Deshmukh On Santosh Deshmukh Murder case
Dhananjay Deshmukh On Santosh Deshmukh Murder case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराडविरोधात 1400 पानी आरोपपत्र दाखल

point

धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली मोठी प्रतिक्रिया

point

"सीआयडी आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली की..."

Dhananjay Deshmukh Press Conference : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी महत्त्वाची अपडे समोर आली आहे. सीआयडीने आरोपी वाल्किम कराडविरोधात 1400 पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्किम कराड मुख्य सूत्रधार असल्याचं सीआयडीने या आरोपपत्रात म्हटलं आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडेही अडचणीत येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशातच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

"ज्यावेळी हा लढा सुरु झाला. ज्या दिवशी आमच्या भावाची हत्या केली. एका निष्पाप माणसाला यांनी संपवलं. आमची न्यायासाठी लढाई सुरु झाली. आम्हाला कोणताही अनुभव नव्हता. कशाप्रकारे यांनी ही गुन्हेगारी वाढवली होती. कशाप्रकारे यांची पाळेमुळे सगळीकडे पसरले होते. सगळ्या घटना जरी वेगवेगळ्या असल्या तरी याचं सर्व मूळ एकच आहे. ते म्हणजे संघटीत गुन्हेगारी..संघटीत गुन्हेगारीचे सगळे आरोपी एकच आहेत. यांचं खूप मोठं जाळं आहे. याआधीही त्यांनी खूप घटना घडवल्या आहेत. यातून यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत लढाई लढण्याचा आम्ही संकल्प केला. या आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाहीत. सीआयडी आणि एसआयटीच्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केली आहे. त्यांना वेळोवेळी भेटत आहोत. हा तपास निपक्षपातीपणे झाला पाहिजे. या आरोपींना फाशी झाली पाहिजे", अशी मोठी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिलीय.

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder: 'वाल्मिक कराडच्या आदेशावरूनच खून झाला', सुरेश धस प्रचंड आक्रमक

देशमुख प्रकरणातील अनेक गोष्टी उलगडत असल्याने आता थेट संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडचं आरोप पत्रात स्पष्टपणे उल्लेख केला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रात वाल्मीक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून वाल्मीक कराडचा उल्लेख आहे. आरोप पत्रामध्ये आरोपी नंबर दोन मध्ये विष्णू साठेचाही उल्लेख आहे. आबा कंपनीला खंडणी मागितली त्यातून झालेल्या वादानंतर हत्या झाल्याचेही यात स्पष्ट झालं आहे.

हे ही वाचा >>Walmik Karad हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टर माईंड, CID चं आरोपपत्र

हे वाचलं का?

    follow whatsapp