MLA Disqualification : "तुम्ही न्यायालयाला सांगू नका", सरन्यायाधीश चंद्रचूड ठाकरेंच्या वकिलावर भडकले

मुंबई तक

ADVERTISEMENT

सरन्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणीत काय घडलं?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरण

point

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली

point

सरन्यायाधीश इतके का भडकले

Supreme court MLA Disqualification case : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीच्या तारखेवरून उद्धव ठाकरेंच्या वकिलांना सरन्यायाधीशांनी चांगलेच सुनावले. 'तुम्ही इथे येऊन बसून तुम्हाला कोणत्या तारखा हव्यात आहेत, हे कोर्ट मास्तरला का सांगत नाही?', अशा शब्दात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावले. (CJI chandrachud slams to Counsel of Ajit pawar Faction that don't dictate this court)

ADVERTISEMENT

शिवसेना आमदार अपात्रता आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता या दोन्ही प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटाच्या आमदाराला अपात्र ठरवले नाही. 

आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी

सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. मंगळवारी (6 ऑगस्ट) न्यायालयात दोन्ही प्रकरणांवर एकत्रित सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीशांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लेखी बाजू मांडण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ वाढवून दिला. त्याचबरोबर नोडल काऊन्सिलने दोन आठवड्यात संक्षिप्त प्रतिज्ञापत्र दोन आठवड्यात तयार करावे, असे निर्देश दिले. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सरन्यायाधीशांनी वकिलांना सुनावले

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीशांनी सांगितले की, शिवसेनेच्या प्रकरणात कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे. यावेळी अजित पवार गटाने कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ वाढवून मागितला. 

ADVERTISEMENT

त्यावर सरन्यायाधीशांनी सांगितले की, एन.के.कौल विनंतीवरून लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी कोर्टाने तीन आठवड्यांचा वेळ वाढवून देत आहोत.  

ADVERTISEMENT

नोडल काऊन्सिलची नावे विचारली. त्यावर अद्याप निश्चित झालेले नसल्याचे वकिलांनी सांगितले. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, आम्ही सांगतोय की, दोन नोडल काऊन्सिल असावेत आणि त्यांची नावे सांगा. 

आमच्या जागेवर बसून कोर्टाला सांगा कोणती तारीख हवीये?

अजित पवार गटाच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, "निवडणूक येत आहे. आम्ही तीन दिवसांत म्हणजे शुक्रवारपर्यंत करू शकतो."

दरम्यान, ठाकरे गटाचे वकील उठले आणि प्रकरणाला विलंब होत असून, न्यायालयाने तारीख द्यावी, अशी विनंती केली. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले, कोर्टाला आदेश देऊ नका. आम्ही पुढच्या गुरुवारपर्यंत वेळ दिला आहे. तुम्ही इथे येऊन बसत का नाही आणि तुम्हाला कोणत्या तारखा हव्या आहेत, हे कोर्टाला सांगत नाही?", अशा शब्दात सरन्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT