MLA Disqualification: ठाकरे गटाने दिलेले ‘ते’ 23 पुरावे, जसेच्या तसे, ‘त्या’ आमदारांचं काय होणार?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

in the ongoing hearing on disqualification case of shiv sena mla thackeray group submitted 23 pieces of evidence
in the ongoing hearing on disqualification case of shiv sena mla thackeray group submitted 23 pieces of evidence
social share
google news

Shiv Sena UBT MLA Disqualification मुंबई: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणावर सुरू असलेल्या सुनावणीत, महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील निर्णयासाठी अतिरिक्त पुरावे सादर करण्याची परवानगी दोन्ही शिंदे आणि ठाकरे गटांना दिली होती.

ADVERTISEMENT

21 नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या सुट्टीनंतर पुन्हा सुरू झालेल्या सुनावणीत, उद्धव ठाकरे गटाचे व्हीप सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे उलटतपासणी घेतली.

शिवसेना (UBT)ने सादर केलेले पुरावे हे केवळ मुंबई Tak च्या हाती लागले आहेत. ज्यामध्ये ठाकरे गटाने प्रतिज्ञापत्र, केंद्रीय निवडणूक आयोगाला (ECI) दिलेलं पत्र, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा ठराव, बातम्यांच्या प्रती, ईमेल, स्क्रीनशॉट आणि WhatsApp मेसेजचे फोटो यांचा समावेश असलेल्या पुराव्यांची मालिकाच सादर केली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> अन् बाळासाहेबांसाठी नारायण राणे बनले ‘सुरक्षारक्षक’! लोणावळ्यातील बंगल्यातला सांगितला भन्नाट किस्सा

आमदार अपात्रता प्रकरण: ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांना दिलेले पुरावे, जसेच्या तसे

1. 2013 ते 2018 या 5 वर्षांसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून पक्षांतर्गत निवडणुकांमध्ये निवड झाली.

2. 28 जानेवारी 2013 ला निवडणूक आयोगाला या संदर्भात कळवण्यात आले.

ADVERTISEMENT

3. 2018 ते 2023 या काळासाठीसुध्दा उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून प्रतिनिधी सभेने निवड केली.

ADVERTISEMENT

4. या निवडणूकीचा निकाल निवडणूक आयोगाला 27 फेब्रुवारी 2018 ला कळवण्यात आला.

5. निवडणूक आयोगाने या संदर्भात 5 मार्च 2018 ला स्वीकृती दिली.

6. पक्षाच्या घटनेतील नवीन दुरुस्तीबाबत 4 एप्रिल 2018 ला निवडणूक आयोगाला कळवण्यात आलं.

7. पक्षाच्या घटनेनुसार शिवसेना राजकीय पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख, राष्ट्रीय कार्यकारणी आणि प्रतिनिधी सभा आहे, शिवसेना मुख्य नेता नावाचं पद नाही.

8. जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष संघटनेचं पूर्ण बहुमत.

9. निवडणूक आयोगाकडे 4 एप्रिल 2018 ला देण्यात आलेली घटना हीच शिवसेनेची एकमेव घटना आहे.

10. शिवसेनेत पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार, त्यांचाच निकाल अंतिम.

11. जून 2022 मध्ये उद्धव ठाकरे हेच निर्विवाद शिवसेनेचे पक्षप्रमुख होते.

12. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणी म्हणजे नेतेमंडळातील 13 पैकी 9 नेत्यांचा जून 2022 मध्ये उद्धव ठाकरेंना पाठिंबा होता.

13. यापैकी गजानन किर्तीकरांनी आपली भूमिका बदलली असली तरी जून 2022 मध्ये अपात्रतेच्या घटनेच्या वेळेस किर्तीकरांनी उद्धव ठाकरेंना दिला होता पाठिंबा.

14. 20 उपनेत्यांनी सुध्दा अपात्रतेची घटना घडली तेव्हा उद्धव ठाकरेंनाच दिला होता पाठिंबा.

15. पक्षाचे दोन सचिव मिलिंद नार्वेकर आणि सूरज चव्हाण यांचाही उद्धव ठाकरेंनाच होता पाठिंबा.

16. अपात्रतेच्या घटनेवेळीस नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे या विधान परिषदेतील आमदारांचाही होता उद्धव ठाकरेंना पाठिंबा असा दावा.

हे ही वाचा>> Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

17. 25 नोव्हेंबर 2019 ला पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेतली.

18. या बैठकीत एकनाथ शिंदेंना विधीमंडळ पक्षनेतेपेदी, सुनिल प्रभूंची व्हीप म्हणून नियुक्ती केली.

19. 20 जून 2022 ला विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटली आहेत हे लक्षात आल्यानंतर 21 जून 2022 ला व्हीप काढून पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती.

20. 21 जून 2022 चा सुनिल प्रभूंचा व्हीप मनोज चौगुलेंनी एकनाथ शिंदेंचे पीए प्रभाकर काळेंना व्हॉटसअपवर पाठवला.

21. चौगुलेंचे व्हॉटसअप मेसेजचे स्क्रीनशॉट विधानसभा अध्यक्षांसमोर मांडले.

22. इतर 16 आमदारांनाही हाच बैठकीचा व्हीप पाठवण्यात आला होता.

23. 24 आमदार या बैठकीला उपस्थित राहिले, याच बैठकीत अजय चौधरींची विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करुन विधानसभा अध्यक्षांना कळवण्यात आले.

आता या पुराव्यानंतर विधानसभा अध्यक्ष हे 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT