NCP : जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार? भाजपने थेट 10 कारणंच सांगितली
महाराष्ट्र भाजपकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात जयंत पाटील यांची कशी घुसमट होत आहेत आणि ते का राष्ट्रवादी सोडू शकतात, याची काही कारणं सांगितली आहेत.
ADVERTISEMENT

Maharashtra politics : “जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत, लवकरच ते मार्गक्रमण करतील”, असा दावा केला शिवसेनेचे प्रवक्ते आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी. संजय शिरसाट यांच्या दाव्यानंतर जयंत पाटलांनी “संजय शिरसाटांपेक्षा माझी विश्वासार्हता जरा जास्त असेल नाही का? त्यांनी मांडलेल्या मुद्द्यावर तुम्ही माझी प्रतिक्रिया घेणं म्हणजे जरा जास्तच झालं”, असं सांगत भूमिका स्पष्ट केली. पण, आता भाजपने यात उडी घेतली असून, राष्ट्रवादी सोडण्याची दहा कारणंच सांगितली आहेत.
महाराष्ट्र भाजपकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला असून, त्यात जयंत पाटील यांची कशी घुसमट होत आहेत आणि ते का राष्ट्रवादी सोडू शकतात, याची काही कारणं सांगितली आहेत.
Jayant Patil : भाजपने कोणती कारण सांगितली?
भाजपने या व्हिडीओत म्हटलंय की, “शरद पवारांनी जे काही निवृत्तीनाट्य रंगवलं होतं त्या नाटकात शरद पवारांव्यतिरिक्त बेस्ट परफॉर्म केलं ते जयंत पाटलांनी. किती रडले होते ते. पण आता जाणवतं ते अश्रु खरे होते, फक्त कारण वेगळं होतं म्हणूनच जयंत पाटील पक्षातून बाहेर पडणार अशी कुजबूज सुरू झाली आहे. जयंत पाटलांकडे पक्षातून बाहेर पडण्यासाठी एक नाही, तर दहा कारणं आहेत.”
शरद पवारांनी जयंत पाटलांची नाचक्की केली -भाजप
“2019 पासून शरद पवारांनी जयंत पाटलांना डावलायला सुरूवात केली. आणि कधीकाळी गृहमंत्रालय भूषवणाऱ्या पाटलांना जलसंधारण मंत्रीपद देऊन त्यांची नाचक्की केली. त्यात राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे आणि अजित पवार असे दोन गट आणि पाटील याही गटातील नाही आणि त्याही. त्यामुळे त्यांचं एकूणच राष्ट्रवादीतलं भविष्य अंधारातच राहिलं”, असं महाराष्ट्र भाजपने म्हटलं आहे.
हेही वाचा >> मविआ की युती… महाराष्ट्रात बीआरएस, वंचित बहुजन आघाडी कुणासाठी घातक?
“जयंत पाटील मूळातच महत्त्वकांक्षी. आता हेच पहा ना… त्यांना पडणारी उपमुख्यमंत्री पदाची स्वप्न कुणापासून लपून राहिलेली नाही. आता तर पक्षाचा राष्ट्रीयत्वचा मानही गेला आणि सुप्रिया सुळे अध्यक्षपदी आल्यामुळे अजितदादांचे वांदे झाले. तेव्हा यांच्या स्वप्नांना कोण विचारणार?”, असा प्रश्नही भाजपने या मुद्द्यावर भाष्य करताना उपस्थित केला आहे.
BJP : “जयंत पाटलांना मिळाला ठेंगा”
“महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेते पद भूषवायचं होतं, तेव्हाही त्यांची झोळी रितीच राहिली. कार्यकारी अध्यक्ष निवडताना शरद पवारांनी दोन्ही गटांना समाधानी केलं. सुप्रिया सुळेंना आणि अजित पवारांचे समर्थक अशी ओळख असलेल्या प्रफुल्ल पटेलांना कार्यकारी अध्यक्ष बनवलं. जयंत पाटलांना फक्त ठेंगा मिळाला”, असं भाजपने म्हटले आहे.
हेही वाचा >> Russia : येवजेनी प्रिगोझिन यांच्या वॅग्नेरने व्लादिमीर पुतिन विरोधात का केलं बंड?
ठराज्याचे सर्व निर्णय अजित पवार घेतात आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय राजकारणाची धुरा शरद पवारांच्या हातात आहे. त्यामुळे जयंत पाटील नाममात्र प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यात शरद पवार चुकून निवृत्त झालेच, तर स्वतःला वरिष्ठ समजणाऱ्या जयंत पाटलांना सुप्रिया सुळे आणि अजितदादांच्या हाताखाली काम करणं कठीण होईल”, असा दावाही भाजपकडून करण्यात आला आहे.
जयंत पाटील राष्ट्रवादी सोडण्याची प्रमुख १० कारणे. pic.twitter.com/DqedwvkoBf
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 24, 2023
“आता जयंत पाटलांना शरद पवारांसारखंच आपल्या मुलाला पुढे आणायचं आहे. नुकताच त्यांचा मुलगा प्रतिक जयंत पाटील याला राजाराम बापू कारखान्याचा अध्यक्ष म्हणून निवडून आणलं. पण, इथे स्वतःच्या संख्या पुतण्याला डावलणारे पवार साहेब जयंतरावांच्या मुलाला थोडेच पुढे येऊ देणार”, असं म्हणत भाजपने जयंत पाटील का राष्ट्रवादी सोडून शकतात याची काही कारणे सांगितली आहेत.