Mumbai Tak Chavadi: 'पैशांशिवाय काँग्रेस पक्ष उभा राहू शकतो का?', हर्षवर्धन सपकाळ थेट म्हणाले, "राजकारणात..."
Harshwardhan Sapkal Mumbai Tak Chavdi Interview: काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी खरंच पैसा लागतो का? पैशाशिवाय पक्ष उभा राहू शकतो असं तुम्हाला वाटतं का? यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची भाजपवर टीका

"भाजप आता राक्षसासारखा मोठा..."

हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले?
Harshwardhan Sapkal Mumbai Tak Chavdi Interview: काँग्रेस पक्ष चालवण्यासाठी खरंच पैसा लागतो का? पैशाशिवाय पक्ष उभा राहू शकतो असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नांचं उत्तर देताना काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "दोन इंजिन राजकारणात पाहिजेच, असा आज एक सामजिक सार्वजनिक समज आहे. एका आहे जातीच. जात किंवा धर्माची पॉवर तुमच्याकडे असली पाहिजे आणि दुसरी म्हणजे रिसोर्सेचची. या दोन गोष्टी असणाराच माणूस काहीतरी करू शकतो, अशी मान्यता आहे. पण काही गोष्टी यातून होऊ शकतात. पण या लढाईत मी जिथे आहे, त्याठिकाणी तर आता संसाधनं पण कमी पडायला लागली. कारण भाजप आता राक्षसासारखा मोठा पक्ष झाला आहे. त्यांची संसाधने एवढी झाले आहेत की आम्ही पाच पैसे लावले तर ते पन्नास रुपये लावतील. आता ही लढाई रिसोर्सेसची राहिलेली नाही. आता वेगळ्या अँगलने या फोर्सेसची लढावं लागणार आहे".
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, "आपल्याला वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलं पाहिजे, असा विचार काँग्रेसमध्ये सुरु झाला आहे का? यावर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, संक्रमण अवस्थेतून आपला सगळा समाज जात आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, व्यवस्था त्यातून जाणं हे स्वाभाविक आहे. हार-जीतच्या पेक्षाही जी लिगसीची विचारधारा आहे, ती विचारधारा आता पुढे कशी घेऊन जायची, हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. छोटे-मोठे बदल होत राहिले. पण आता झटकन एक मोठा बदल, जो तंत्रज्ञान, इंटरनेट, सोशल मीडिया, एआय नावाची भानगड त्यात आली आहे.
हे ही वाचा >> Devendra Fadnavis: "माझे दोन्ही उपमुख्यमंत्री मावळे, शिवसृष्टीसाठी 50 कोटी...", CM फडणवीस नेमकं काय म्हणाले?
हे सर्व संदर्भ बदलेले आहेत. जी आयडिया ऑफ इंडिया आहे ती आम्ही घेऊन जात होतो. त्या आयडिया ऑफ इंडियाला समोर ठेऊन स्वातंत्र्याचा लढा पुकारला गेला. स्वातंत्र्याच्या चळवळीत लढताना केवळ सत्तेचं हस्तांतरण नव्हतं तर व्यवस्था परिवर्तन होतं. गोरे गेले आणि काळे आले. काळ्यांनीच राज्य केलं असं नाही. पूर्ण व्यवस्था बदलायची. त्याची तयारी स्वातंत्र्य संग्रामापासून झाली. आपलं संविधान त्यानंतर निर्माण झालं".
हे ही वाचा >> Eknath Shinde : "बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, तुम्ही घरगडी...", DCM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
"माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचा पार्टीने खूप मोठा सन्मान केला आहे. बूथवर मतदारांच्या वोटर्स स्लिप वाटणे, बूथ एजंट म्हणून काम करणे. दोन वेळ जिल्हा परिषद सदस्य, विधानसभेचा सदस्य आणि गेल्या बारा वर्षापासून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचा पदाधिकारी या नात्यानं मला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मिळाल्या. दरम्यानच्या काळात सामाजिक सांस्कृतिक क्रिडा क्षेत्रात वेगवेगळी रचनात्मक आणि संघर्षात्मक कामं करता आली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी माझ्या घरातील राजकीय प्रकियेतील पहिलाच कार्यकर्ता आहे", असं हर्षवर्धन सपकाळ नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या पदग्रहण सोहळ्यात म्हणाले होते.