Maratha Reservation : ‘चूक तुमची आहे, कायदा…’, जरांगे पाटील फडणवीसांना स्पष्टच म्हणाले

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

maratha reservation manoj jarange patil manoj jarange patil criticize devendra fadnavis
maratha reservation manoj jarange patil manoj jarange patil criticize devendra fadnavis
social share
google news

Manoj jarange Patil On Devendra Fadnavis, Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना (Manoj jarange Patil)  आज रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. तत्पुर्वी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) लक्ष्य केले. चूक तुमची आहे, आमची नाही. कायदा बिघडवायची सूरूवात तुम्ही केली आम्ही नाही, असे स्पष्टच बोलत जरांगे फडणवीसांवर टीका केली. तसेच तुमच्या सत्ताधारी नेत्यांना समज द्या नाहीतर अटक करा. तसे नाही झाल्यास मराठ्यांसोबत तुम्हाला गाठतो, असा इशारा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. (maratha rerservation manoj jarange patil slams devendra fadnavis eknath shinde maratha protester kunabi certificate)

ADVERTISEMENT

राज्यातील आंदोलक मराठ्यांना मारहाणीच्या व त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरु असल्याचे जरांगे यांचे म्हणणे आहे. यावर जरांगे म्हणाले की, तुम्ही जर गोरगरीब मराठ्यांना हाणणार असाल, तर आम्ही त्या नेत्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करू. गृहमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही यात बारकाईने लक्ष घाला आणि भोकरदन मधले कोण नेते आहेत त्यांन समज द्या किंवा अटक करा, नाहीतर मराठ्यांसोबत मी तुम्हाला गाठतो. कारण चुक तुमची आहे, कायदा बिघडवायची सुरूवात तुम्हीच केलीत आम्ही नाही, असा हल्ला जरांगेनी फडणवीसांवर चढवला.

हे ही वाचा : Crime News: जमिनीवर पडलेला मृतदेह, मानेवर जखमेच्या खुणा अन्… नवविवाहितेच्या सासरी नेमकं काय घडलं?

तसेच सत्ताधारी नेत्यांना सांगाव गोरगरीब मराठ्यांवर अन्याय करू नका, त्याच्यासोबत हाणामारी करू नका, खोटे गुन्हेही दाखल करायला लावू नका. नाहीतर या नेत्यांविरोधात दंड थोपटू, असा इशाराच जरांगेनी सरकारला दिला आहे.

हे वाचलं का?

जरांगे पाटील पुढे म्हणाले, 24 डिसेंबरपर्यंत समितीकडून अहवाल घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करा. ही सरकारला विनंती आहे. आणि 100 टक्के दोन्ही उप मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देणार ही आम्हाला खात्री आहे आणि नाही दिलं तर मराठा शांततेत आंदोलन करणार, असे देखील जरांगे यांनी यावेळी सांगितले आहे.

हे ही वाचा : Crime : क्रूरतेचा कळस! महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेहासोबत ठेवले…

गरीब ओबीसींना आणि इतरांनाही पटलं आहे की, अनेक गरीब मराठ्यांच्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. त्यामु्ळे त्यांच्या हक्काचं त्यांना मिळत असेल तर दिले पाहिजे. ओबीसी नेत्यांनी त्यास विरोध करू नये, असे सामान्य ओबीसी, धनगर आणि मुस्लीम बांधवाना वाटते. त्यामुळे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र दिले पाहिजे, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

आता मात्र ओबीसी नेत्यांनी हट्टीपणा करून वातावरण बिघडवलं नाही पाहिजे, असे सगळ्या ओबीसी बांधवांना वाटतं. याच्या राजकीय हट्टापायी सामान्य ओबीसींना वेठीस धरू नये, त्यांच्या त्यांना नोंदी मिळाल्या की गोरगरीबाला दिले पाहिजे, हेच सत्य आहे असेही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT