Pravin Darekar : मनोज जरांगेंचं शरद पवारांशी कनेक्शन? दरेकरांच्या विधानांनी खळबळ

प्रशांत गोमाणे

Pravin Darekar ON Sit Inquiry, Manoj Jarange : भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मराठा आंदोलक महिला संगीता वानखेडे यांनी जरांगेंवर केलेले आरोप सभागृहात वाचून दाखवले. 'जरांगे कुणाला विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन ज्याचा येत होता', शिंदे साहेब... 'एक फोन ज्याचा येत होता त्याला विश्वासात घेत होते, तो फोन शरद पवारांचा होता'

ADVERTISEMENT

maratha reservation pravin darekar reaction on sit inquiry sharad pawar manoj jarange patil sangita wankhede allegation devendra fadnavis maharashtra politics
मराठा आंदोलनांच्या सभांसाठी, जेसीबी, ट्रॅक्टरसाठी पैसै आले कुठून? या सगळ्या आर्थिक व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.
social share
google news

Pravin Darekar ON Sit Inquiry, Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या गंभीर आरोपाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानसभेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. अशात आता 'शरद पवारच जरांगेंना फोन करायचे, आंदोलनाचा खर्चही तेच करायचे. शरद पवार (Sharad Pawar) जसे सांगतात तसे जरांगे करतात, असा संगीता वानखेडे (Sangita Wankhede) यांनी केलेला आरोप भाजप आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी सभागृहात वाचून दाखवत, जरांगेंच्या वक्तव्याची चौकशी करून गुन्हा दाखल करत त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.  (maratha reservation pravin darekar reaction on sit inquiry sharad pawar manoj jarange patil sangita wankhede allegation devendra fadnavis maharashtra politics) 

 भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मराठा आंदोलक महिला संगीता वानखेडे यांनी जरांगेंवर केलेले आरोप सभागृहात वाचून दाखवले. 'जरांगे कुणाला विश्वासात घेत नव्हते. फक्त एक फोन ज्याचा येत होता', शिंदे साहेब... 'एक फोन ज्याचा येत होता त्याला विश्वासात घेत होते, तो फोन शरद पवारांचा होता' त्यामुळे पवार साहेबांचा या आंदोलनात कसा हात होता, हे वानखेडे सांगतात, असे दरकेर यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Manoj Jarange : "फडणवीसलाच जेलमध्ये टाकावं लागेल"

 दरेकर यांच्या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेत गोंधळ घातला होता. मात्र दरेकर पुढे म्हणाले, बारसकर नार्को टेस्ट कराही म्हणतातय, दुध का दुध का पाणी होईल. आणि मी कस पवार साहेबांच्या विरोधात असे बोलेन, असे देखील दरेकर यांनी सांगितले. 
 
 दरम्यान दरेकर पुढे म्हणतात, 'राणे साहेब आमचे कोकणाच्या दौऱ्यावर असताना अमृत महोत्सव की रौप्य महोत्सव बोलले, म्हणून मी कानाखाली मारली असती, असे विधान करण्यात आलं होते. त्यावेळी आपण जेलमध्ये टाकलंत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे या राज्यात सरकार म्हणून सगळ्यांना न्याय एकच पाहिजे. जर जरांगे उप मुख्यमंत्र्यांवर अशाप्रकारे अश्लाघ्य भाषा वापरत असतील तर जरांगे पाटलांच्या वक्तव्याची चौकशी करत गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. 

हे ही वाचा : 'जरांगेंचा विश्वास फक्त शिंदेवर', फडणवीसांवर नाही, दानवेंचा घणाघात

 मनोज जरांगे म्हणतात, मी एक रूपयाही समाजाकडून घेतला नाही. आणि कुणीही पैसा घ्यायचा नाही. मग मराठा आंदोलनांच्या सभांसाठी, जेसीबी, ट्रॅक्टरसाठी पैसै आले कुठून? या सगळ्या आर्थिक व्यवहारांची ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp