Maratha Reservation: “लायकी काढता, ‘खुटा उपटण्याची’ भाषा करता..”, भुजबळ जरांगेंवर एवढे का संतापले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Minister Chhagan Bhujbal criticizes Manoj Jarange Patil on Maratha reservation on Mandal Commission
Minister Chhagan Bhujbal criticizes Manoj Jarange Patil on Maratha reservation on Mandal Commission
social share
google news

Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणावरून राजकारण तापलेलं असतानाच आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) विरोध केला आहे. त्यामुळे जरांगे-भुजबळ वाद विकोपाला गेला आहे. हा वाद टोकाला गेलेला असतानाच छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जोरदार हल्लाबोल केला आहे. मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर उपोषणकर्ते म्हणत तुमचा पराकोटीचा द्वेष दिसत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

हा काय प्रकार?

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत निशाणा साधत जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, ‘एकीकडे याच ओबीसी प्रवर्गात आरक्षण हवं म्हणून आंदोलन उभारता, मागासवर्गीयांची लायकी काढता, ‘खुटा उपटण्याची’ भाषा करता आणि दुसरीकडे तेच आरक्षण रद्द करण्याची भाषा करता? हा काय प्रकार आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा >> Chhatrapati Sambhajiraje: ‘लोकसभा लढवायची असेल तर…’ संभाजीराजेंसमोर ‘मविआ’ने ठेवली विचित्र अट!

मागासवर्गीयांची लायकी काढता

ज्या मंडल आयोगामुळे समाजातील बारा बलुतेदारांना आणि भटक्या विमुक्तांना आरक्षणाचा हक्क मिळाला. त्यामुळे त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली, त्यांना राजकीय प्रतिनिधीत्वही मिळाले. मात्र तुम्ही त्याच मंडल आयोगाला आव्हान देण्याची भाषा करू लागला. तर दुसरीकडे ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करता आणि त्याच वेळी मागासवर्गीयांची लायकी काढता हा काय प्रकार आहे असा सवालही त्यांनी केला आहे.

हे वाचलं का?

जरांगेंचं प्रत्युत्तर काय ?

छगन भुजबळ यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर या पोस्टमधून अनेक गंभीर आरोपही त्यांनी केले आहेत. त्यामुळे आता या आरोपांमुळे जरांगे पाटील भुजबळांना काय प्रत्युत्तर देतात याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maratha Reservation: ‘भुजबळांच्या कंबरेत लाथा घालून…’ शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT