Cabinet Meeting Desicion: जैन समाजासाठी महामंडळ, मंत्रिमंडळ बैठकीतील 33 निर्णय जसेच्या तसे

मुंबई तक

ADVERTISEMENT

मंत्रिमंडळ बैठकीतील 33 निर्णय जसेच्या तसे
मंत्रिमंडळ बैठकीतील 33 निर्णय जसेच्या तसे
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 33 निर्णय

point

जैन समाजासाठी स्थापन करणार अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ

point

राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय

Cabinet Meeting Desicion 4th October: मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जास्तीत जास्त निर्णयांना मंजूरी देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न हा आता शिंदे सरकारकडून केला जात आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे सरकारचं मंत्रिमंडळ हे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेत आहे. आज (4 ऑक्टोबर) पुन्हा एकदा मंत्रिमंडळाने बऱ्याच निर्णयांना मंजुरी दिली आहे. (minority corporation for jain community shinde govt cabinet meeting decision as such)
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह इतर मंत्री यावेळी उपस्थित होते. याचवेळी जैन समाजासाठी साठी देखील अत्यंत महत्त्वाचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

हे ही वाचा>> Narhari Zirwal: मंत्रालयात फुल ड्रामा, नरहरी झिरवाळांना थेट जाळीवर का मारली उडी?

जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय इतरही अनेक निर्णय घेण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्या निर्णयांना देण्यात मान्यता?

  1. राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ
  2. महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार
  3. दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन
  4. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास गती देणार
  5. टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व. अनिल भाऊ बाबर यांचे नाव
  6. पूर्णा नदीवर दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामांना गती देणार; सिल्लोड मधील जमिनीला सिंचन
  7. प्राचीन व ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास आता दोन वर्षाचा तुरुंगवास, एक लाख दंडाची तरतूद
  8. राज्यातील खेळाडूंसाठीच्या पारितोषिकांचा रकमेत वाढ
  9. राज्यातील आणखी १०४ आयटीआय संस्थांचे नामकरण
  10. संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना राबवणार
  11. लहान जलविद्युत प्रकल्पासाठी बांधा वापरा हस्तांतरण धोरण
  12. कोकण पुणे विभागासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या
  13. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना
  14. राज्यात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्टता केंद्र 
  15. जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ
  16. महाराष्ट्र भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळ
  17. आजरा तालुक्यातील वेळवट्टी, गवसे, घाटकरवाडी बंदिस्त पाईपलाईन टाकणार
  18. बंजारा, लमाण तांड्यात ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल
  19. कागल येथील सागावमध्ये नवीन शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय
  20. महाराष्ट्र सागरी मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार
  21. कुडाळ तालुक्यातील डोंगरेवाडीत साठवण तलाव
  22. बारी, तेली, हिंदू खाटीक, लोणारी समाजांसाठी आर्थिक विकास महामंडळे
  23. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना कायमस्वरूपी राबवणार; २६०४ कोटीस मान्यता
  24. राज्यात हरित एकात्मिक डेटा सेंटर पार्क स्थापन करणार. १ लाख ६० हजार कोटींचे गुंतवणूक अपेक्षित
  25. उच्च तंत्रज्ञानावर आधारित अतिविशाल प्रकल्प योजनेत सुधारणा; अधिकाधिक प्रकल्पांना प्रोत्साहन
  26. राळेगण सिद्धी येथील उपसा सिंचन योजनेचे सक्षमीकरण
  27. शिरोळ तालुक्यातील गावांमध्ये भूमिगत चर योजना राबवणार
  28. बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना
  29. सोलापूर ते मुंबई हवाई मार्गासाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देणार
  30. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसायरोध भत्ता देणार
  31. डेक्कन कॉलेज, गोखले संस्था, टिळक महाराष्ट्र मधील कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना
  32. वडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठी 
  33. रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात वाढ 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT