मुंबई Tak Exclusive: NCP ची बँक खाती अजित पवार गटाच्या ताब्यात, मुंबईत पक्ष कार्यालयावरही दावा
NCP: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची सर्व बँक खाती ताब्यात घेतली असून मुंबईतील बॅलार्ड पिअर येथील मुख्यालयावर देखील दावा सांगितला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
अजित पवारांचा मोठा दावा
अजित पवार गटाकडे NCP ची बँक खाती
मुंबई पक्ष कार्यालयावरही सांगितला दावा
Ajit Pawar NCP Mumbai office: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्याचा मोठा निर्णय हा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. ज्यामुळे अजित पवार गटाला मोठा दिलासा मिळाला. मात्र, त्यानंतर अजित पवार गटाने हालचालींना सुरुवात केली. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थेट मुंबईतील बॅलार्ड पिअर भागातील 'राष्ट्रवादी भवन' या पक्षाच्या मुख्यालयावरच आपला दावा केला आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बँक खाती देखील त्यांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे शरद पवारांना मात्र मोठा धक्का बसला आहे. (mumbai tak exclusive bank accounts of ncp in possession of ajit pawar groups party office in mumbai is also claimed)
ADVERTISEMENT
निवडणूक आयोगाचा निकाल येण्याआधीच अजित पवारांच्या गटाने मुंबईतील पक्ष कार्यालय आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. ज्यावर आता त्यांनी अधिकृतपणे दावा केला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार त्यांचा हा दावा मान्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अजित पवारांना पक्ष कार्यालय मिळणार?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यालये ही राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टची मालमत्ता असल्याचा दावा हा सातत्याने शरद पवार गटाकडून करण्यात येत होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसचं मुख्यालय हे वेल्फेअर ट्रस्टचं नसून ते पक्षाच्या मालकीचं असल्याचा दावा हा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच आता पक्ष कार्यालय नेमकं कोणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> सुनील प्रभू फडणवीसांची वाट पाहत थांबले, विधानभवनात काय घडलं?
शरद पवारांकडे दोन पर्याय..
सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मुख्यालय हे मंत्रालयच्या नजीक होतं. मात्र, साधारण 2015 साली मुंबईतील मेट्रोच्या कामामुळे राष्ट्रवादीचं हे कार्यालय पाडण्यात आलं. त्याऐवजी मुंबईतील बॅलार्ड पिअर परिसरात राज्य सरकारच्या वतीने त्यांना नवं कार्यालय देण्यात आलं होतं. मात्र, आता ते कार्यालय देखील शरद पवार यांना गमवावं लागू शकतं.
आता याचबाबत शरद पवार यांच्याकडे दोन पर्याय आहेत. त्यापैकी पहिला पर्याय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती अर्ज करावा लागेला. राष्ट्रवादी काँग्रेसचं जे बॅलार्ड पिअर येथे कार्यालय आहे ते आपल्याकडेच राहावं अशी विनंती शरद पवार गटाला मुख्यमंत्र्यांना करावी लागेल. किंवा, राज्य सरकारकडून दुसऱ्या कार्यालयाची मागणी शरद पवार यांना करावी लागेल.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> Lok Sabha : ठाकरेंना 21, काँग्रेसला 15, पवारांना किती जागा?
जर अजित पवार यांचा दावा राज्य सरकारने मान्य केला तर सध्या अस्तित्वात असलेल्या पक्ष कार्यालयाचा दावा शरद पवार गटाला सोडावा लागेल. जो त्यांच्यासाठी एक मोठा धक्का असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT