Nawab Malik : मलिकांमुळे महायुती कात्रीत, आता भाजप काय करणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास भाजपचा विरोध आहे.
अजित पवारांच्या बैठकीत उपस्थित असलेले आमदार नवाब मलिक.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवाब मलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच

point

भाजपचा नवाब मलिकांना विरोध

point

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिले होते पत्र

 Nawab Malik News : 'नवाब मलिक यांच्यावर ज्या पद्धतीचे आरोप आहेत, ते पाहता त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे', अशी स्पष्ट भूमिका मांडत देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास अजित पवारांना विरोध केला होता. मात्र, मलिक हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मलिक यांनी अजित पवारांच्या बैठकीला हजेरी लावली. त्याचबरोबर विधानसभेतही ते सत्ताधारी बाकावर दिसले. त्यामुळे भाजप आता काय भूमिका घेणार? या चर्चेला तोंड फुटले आहे. (Nawab Malik attended Ajit Pawar's NCP meeting, what will bjp now?)

ADVERTISEMENT

नवाब मलिक यांच्यामुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता आहे. भाजपने विरोध करूनही अजित पवारांनी नवाब मलिक यांना पक्षात ठेवले असून, अधिवेशनात मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याचे दिसले. आता अजित पवारांनी बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित होते. त्यामुळे आता भाजपची भूमिका काय असणार? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

फडणवीसांनी मलिकांवर केले आहेत देशद्रोहाचे आरोप

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचे आरोप केले होते. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीशी आर्थिक व्यवहार केल्याचे आरोपही फडणवीस यांनी केले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Mazi Bahin Ladki Yojana : उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र नाही? मग असा भरा अर्ज

नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसले होते. त्यावरून विरोधकांनी भाजपला घेरले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून मलिकांना महायुतीत घेण्यास विरोध केला होता.

 

ADVERTISEMENT

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेले पत्र?

Devendra Fadnavis had written letter to ajit pawar and opposed to nawab malik
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला होता.

अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीला हजेरी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान नवाब मलिक सत्ताधारी बाकावरच बसले.

ADVERTISEMENT

Nawab malik in maharashtra assembly house
नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसत आहेत.

हेही वाचा >> ज्याच्या सत्संगात 100 जणांचा जीव गेला तो भोले बाबा आहे तरी कोण?

त्याचबरोबर अजित पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीलाही मलिक हजर होते. मलिकांवर गंभीर आरोप करणाऱ्या भाजपची यामुळे डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

वडेट्टीवारांचा फडणवीसांना सवाल

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मलिकांवरून थेट देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. 'नवाब मलिक सोबत आहेत की नाही, याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी करावा', असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे. 

'महायुतीमध्ये सारे काही अलबेल आहे चालू आहे, असे मला दिसत नाही. त्यांच्यामध्ये प्रचंड कुरघोड्या सुरू आहेत. नवाब मलिकांच्या मताची गरज आहे म्हणून कदाचित त्यांना बोलावले असणार", असे वडेट्टीवार म्हणाले. 

अजित पवारांना मलिकांबद्दल पत्रकारांनी विधानभवनात प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले की, तुम्हाला काही त्रास होतोय का? उलट सवाल करत जास्त बोलणे टाळले.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT