Rohini Khadse : मुक्ताईनगरचा MVA चा उमेदवार ठरला! रोहित पवारांनी केली मोठी घोषणा
Rohini Khadase : महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जळगावमधील मुक्ताईनगरमधून ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
ADVERTISEMENT
Rohini Khadse : राज्यातील राजकारणात प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन सामंजस्यपणाची भूमिका घेतली होती. तर त्याच वेळी सरकारवरही त्यांनी निशाणा साधला होता. तर त्याआधी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ॲड. रोहिणी खडसे-खेवलकर (Rohini Khadse Khewalkar) यांच्यावर सोपवून त्यांनी त्यांना नवी जबाबदारी दिली होती. (rohini khadse Khewalkar Rohit Pawar first candidate NCP Jalgaon Muktainagar candidate)
ADVERTISEMENT
रोहिणी खडसे खडसे नाव चर्चेत
शरद पवार यांना रोहिणी खडसे यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवलेली असतानाच आता राष्ट्रवादीने आपली पहिली उमेदवारी म्हणून रोहिणी खडसे यांचेच नाव जाहीर केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
हे ही वाचा >> Sanjay Raut :’…तो अदृश्य फोन कोणाचा ?’; राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
वाढदिवसानिमित्त भेट
राष्ट्रवादीचे विधान परिषदचे आमदार एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुक्ताईनगर येथ खडसे यांच्या फार्मवर झालेल्या मेळाव्यात रोहित पवार यांनी रोहिणी खडसे खेवलकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. रोहिणी खडसे यांची उमेदवारी जाहीर होताच आता जळगावच्या राजकारणात नेमकं काय बदल होणार का याकडेही साऱ्यांचे नजरा लागल्या आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Pratyusha banerjee Suicide : “माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही, तिची हत्या केलीये”
खडसे यांच्या नावाचा दबदबा
मुक्ताईनगर मतदार संघाची उमेदवार म्हणून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांची उमेदीवारी जाहीर करून टाकण्यात आली आहे. गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून जळगाव आणि मुक्तीईनगरच्या राजकारणात एकनाथ खडसे यांच्या नावाचा दबदबा राहिला आहे.
आता रोहिणी खडसे यांच्या उमेदवारीमुळे आता मुक्ताईनगरच्या राजकारणाकडे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने रोहिणी खडसे यांची ही पहिलीच उमेदवारी जाहीर केल्याने भविष्यात आणि कोणाचा नंबर लागणार याकडेही राजकारण्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT