Sambhaji bhide:’देशाची स्वातंत्र्यलक्ष्मी कुत्र्याचे…’, संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sambhaji bhide controversy tricolour flag congress criticize
Sambhaji bhide controversy tricolour flag congress criticize
social share
google news

शिवप्रतिष्ठाण संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा गरळ ओकली आहे.संभाजी भिडे यांनी यावेळेस तिरंग्यावर वादग्रस्त विधान केले आहे. तिरंगा झेंडयाला जनानखाना म्हणतं, गेल्या 75 वर्षात आमची स्वातंत्र्यलक्ष्मी कुत्र्याचं निसुख जीवन जगतेय, असे वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केले आहे. या सदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ काँग्रेसने ट्वीट करत या विकृताला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस गुरू मानतात, अशी टीका केली आहे. (Sambhaji bhide controversy tricolour flag congress criticize)

ADVERTISEMENT

तिरंग्यावर भिडे काय म्हणाले?

संभाजी भिडे गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त विधान करत सुटले आहे. आता संभाजी भिडे यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्यांनी तिरंग्याचा अपमान केला आहे. अकबराच्या जनानखान्यात जीवन जगणारी जोधा बाई आणि 15 ऑगस्ट 1947 साली बाहेर आलेली आमची स्वातंत्र्य लक्ष्मी. स्वातंत्र्य लक्ष्मीच्या खांद्यावर तिरंगा झेंडा म्हणजे काय हो? या तिरंगा झेंडयाच्या जनानखान्यात गेले 75 वर्ष आमची स्वातंत्र्यलक्ष्मी कुत्र्याचं निसुख जीवन जगतेय, असे विधान संभाजी भिडे यांनी केली आहे.संभाजी भिडेंच्या या विधानावरून राजकीय वातावरून पुन्हा तापले आहे.

हे ही वाचा :Sanjay Raut:फोटोला चिखल फासला, ‘सामना’ची होळी! CM शिंदेंच्या ठाण्यात काय घडलं?

कॉग्रेसची भाजपवर टीका

महाराष्ट्र काँग्रेसने संभाजी भिडेंचा हा व्हिडिओ ट्वीट करत भाजपवर टीका केली आहे. तिरंगा झेंड्याचा जनानखाना, असे वक्तव्य करणाऱ्या या विकृत माणसाला मोदी आणि फडणवीस गुरू मानतात, देशाच्या एकता आणि अखंडतेला मारक ठरणाऱ्या अशा पिलावळींना मानणाऱ्या आणि मान देणाऱ्या लोकांच्या हातात, देशाची सत्ता आहे, यापेक्षा दुसरे मोठे दुदैव काय असू शकते, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसने भाजपवर केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महात्मा गांधींबाबत बादग्रस्त वक्तव्य

“महात्मा गांधींचे जे वडील म्हटले जातात, ते करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून करमचंद गांधी पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधी यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधींच्या आईला पळवून घरी आणले होते.”, असे संभाजी भिडे म्हणाले होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा :नितीन गडकरींचा भाजपला टोला, संजय राऊत म्हणाले,’अभिनंदन! सत्य परिस्थिती…’

संभाजी भिडे इतक्यावरच थांबले नाहीत, तर पुढे म्हणाले, “महात्मा गांधी यांच्या आईला पळवून आणल्यानंतर जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे महात्मा गांधींचे खरे वडील नाहीत, ते त्या मुस्लिम जमीनदाराचे पुत्र आहेत. महात्मा गांधींचे शिक्षण आणि सांभाळ त्याच मुस्लिम जमीनदाराने केला. माझ्याकडे याबद्दल पुरावे देखील आहे”,असे विधान भिडे यांनी केले होते. भिडे यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.असे विधान संभाजी भिडे यांनी 27 जुलै रोजी अमरावतीत आयोजित एका कार्यक्रमात केले होते.

ADVERTISEMENT

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT