Sanjay Raut : न्यायमूर्ती आरोपीकडे चहा प्यायला लागले तर…’, राऊतांकडून नार्वेकरांवर झोंबणारी टीका
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून महाविकास आघाडी झाली आहे. वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा एक भाग असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ADVERTISEMENT
Sanjay Raut Criticize Rahul Narvekar : शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाआधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा झाली, यामध्ये त्यांनी एकत्र चहापान देखील घेतला. या भेटीवर आता संजय राऊतांनी (Sanjay Raut) टीकेची तोफ डागली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ज्या विधानसभा अध्यक्षांवर न्यायदानाची जबाबदारी दिली आहे. तेच न्यायमुर्ती जर आरोपीकडे चहा प्यायला लागले तर तुम्ही काय अपेक्षा करताय, असा हल्लाबोल राऊतांनी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर केला. (shivsena disqualification case sanjay raut criticize rahul narvekar vidhan sabha speaker maharashtra politics)
ADVERTISEMENT
संजय राऊत शिर्डीत पत्रकारांशी बोलत होते.यावेळी पत्रकारांनी त्यांना आमदार अपात्रतेच्या निकालावर प्रतिक्रिया विचारली होती. सर्वोच्च न्यायालयाने ज्या विधानसभा अध्यक्षांवर न्यायदानाची जबाबदारी दिली आहे.ते सो कॉल्ड न्यायमूर्ती काल मुख्यमंत्र्यांकडे गेले होते. दोघांनी बंद दाराआड चर्चा केली. त्यामुळे न्यायमूर्ती आरोपीकडे चहा प्यायला लागले तर तुम्ही काय अपेक्षा करताय… येथे न्यायमूर्तीच फुटताना दिसतोय,अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
हे ही वाचा : Crime : विवाहित प्रियकराचा ‘त्या’ गोष्टीला नकार, संतापलेल्या प्रेयसीने कापला प्रायव्हेट पार्ट
शिवसेनेला तुम्ही ठाकरे गट म्हणता ते आम्ही मानत नाही. आम्ही शिवसेना आहोत. एकनाथ शिंदे कुठे गेले होते शिवसेना स्थापन करायला. 55 वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेना स्थापन केली का? बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेंव्हा एकनाथ शिंदे गोधडीत असतील..किंवा नसतील…शिवसेना ही शिवसेना बाळासाहेबांची.. उद्धव ठाकरेंचीच असल्याचा दावा देखील संजय राऊतांनी यावेळी केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
बहुजन वंचित आघाडी आणि महाविकास आघाडीत वाद सुरु असल्याची चुकीची माहिती आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी मिळून महाविकास आघाडी झाली आहे. वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा एक भाग असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा : Sharad Mohol : मोहोळ हत्याकांडाचं ‘मुळशी’ कनेक्शन आलं समोर; ‘या’ टोळीवर संशय
2019 ला कट्यार पाठित घुसल्याचा प्रयोग झाल्याचे विधान देवेंद्र फडणवीसांनी केले होते. या विधानाचा समाचार संजय राऊतांनी घेतला आहे. 2024 नंतर देवेंद्र फडणवीसांना नाटकं, एकाकिंकाच करायच्या आहेत, दुसरं काम काय आहे त्यांना अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली आहे.तसेच त्यांच नवीन नाटक हे लवकरच पडतंय, साफ कोसळणार आहे, असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT