Ajit Pawar: 'राज्यातल्या जमिनी विकून पैसे देऊ का?', अजितदादा संतापले.. मंत्रिमंडळ बैठकीतील Inside Story

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

अजितदादा मंत्र्यांवर संतापले..
अजितदादा मंत्र्यांवर संतापले..
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार संतापले

point

ज्येष्ठ मंत्र्यांनाचा नाकारला अजित पवारांनी निधी

point

वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील Inside Story

Ajit Pawar angry in Cabinet Meeting: मुंबई: राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही आज (22 जुलै) अक्षरश: वादळी ठरली. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांनाच निधी देण्यास थेट नकार दिला. यामुळे महायुतीमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. ज्येष्ठ मंत्र्यांनी जेव्हा अजित पवारांकडे निधीची मागणी केली तेव्हा 'राज्यातील जमिनी विकून पैसे देऊ का?' असा करडा सवाल विचारत अजितदादांनी निधीची मागणी धुडकावून लावली. (should we pay by selling land in the state ajit pawar was angry with the ministers inside story of maharashtra cabinet meeting)

ADVERTISEMENT

मंत्रिमंडळ बैठकीत अजितदादा का चिडले?, वाचा Inside Story

'राज्यातल्या जमिनी विकून पैसे देऊ का?' असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीत निधीची मागणी करणाऱ्या मंत्र्यांना केला. त्यामुळे बैठकीत काही काळ तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.

हे ही वाचा>> Sharad Pawar: बंद खोलीत पवार- CM शिंदेंची भेट, कशाबद्दल झाली चर्चा? Inside Story

आज मंत्रालयात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निधीच्या संदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. 

हे वाचलं का?

राज्याचे ग्रामविकास मंत्री पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी निधीची मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. पण यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून निधी देण्यास नकार देण्यात आला.

नकार देताना अजित पवार म्हणाले की, 'राज्यात सध्या 7 महत्त्वाच्या योजना सरकारकडून राबवण्यात येत आहे. त्यामुळे जवळपास 1 लाख कोटी रुपये त्यात खर्च होत आहे. त्यामुळे निधीसाठी पैसे कुठून उभारणार?' असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना केला.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Amit Shah : ''शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार मग अजितदादा कोण?'', शिंदेंचा नेता 'हे' काय बोलून गेला?

ज्यानंतर अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी आपली नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. यामुळे आता या प्रकरणी नेमका कोणता तोडगा काढण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत बेबनाव होणं हे कोणत्याही पक्षाला न परवडणारं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे नेमका काय उपाय काढणार याकडे सर्वांचे डोळे लागणार आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्र सरकारकडून 'या' योजनांवर सुरू आहे खर्च 

  1. 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (महिला व बालविकास विभाग)
  2. ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ (कौशल्य विकास विभाग)
  3. ‘मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’ (अन्न व नागरी पुरवठा विभाग)
  4. ‘मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना’ ( उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
  5. ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना’ (सामाजिक न्याय विभाग)
  6. ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना’ (ऊर्जा विभाग)
  7. ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ (सामाजिक न्याय विभाग)


सुधीर मुनगंटीवारांकडून सारवासारव? 

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीबाबतची माहिती समोर आल्यानंतर भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना या विषयावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

'मंत्र्यांनी कोणतीही राग भावना व्यक्त केली नाही. राज्याची अर्थव्यवस्था ही उत्तम आहे. दरडोई उत्पन्नात 1 लाख ५२ हजार रुपयांची वाढ झाली आहे..  जे त्यांनी 54 वर्षात केले ते आम्ही 10 वर्षात दुप्पट केलं... उध्दव ठाकरे सरकार वेळी दरडोई उत्पन्न घटले होते. यांची सत्तेची भूक पहिली तर बकासूर पण म्हणेल की, रिश्ते में तो ये हमारे बाप लगते है..' असं म्हणत मुनगंटीवार यांनी सरकारमध्ये कोणताही वाद नसल्याचा दावा केला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT