“भाजपचा नवा सनातन धर्म, मोदी-शाह चिअर्स करणार का?”, शिवसेनेचा (UBT) थेट सवाल

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Lalit Modi in Harish salve Marrige : shiv Sena UBT asked to pm Narendra Modi and Amit shah what will you do now?
Lalit Modi in Harish salve Marrige : shiv Sena UBT asked to pm Narendra Modi and Amit shah what will you do now?
social share
google news

Lalit modi in harish salve’s Wedding : ‘ललित मोदीस कुणाचे संरक्षण लाभले आहे, हे साळवेंच्या तिसऱ्या लग्नाने उघड केले. तिसऱ्या लग्नाची ही गोष्ट रंजक आहे. देशाचा व्हिलन त्या लग्नात दिसल्यामुळे भाजपची पुरती नाचक्की झाली, पण निर्लज्जम् सदासुखी! भाजपचा मुखवटा हा असा रोजच गळून पडतो आहे’, अशा शब्दात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपला घेरलं आहे.

ADVERTISEMENT

ज्येष्ठ विधिज्ज्ञ हरिश साळवे यांनी तिसऱ्यांदा लग्न केलं. या विवाह सोहळ्यास फरार घोषित करण्यात आलेला ललित मोदी होता. यावरून शिवसेनेने भाजपला कात्रीत पकडलंय.

सामना अग्रलेखातून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्ला चढवला आहे. शिवसेनेने म्हटलं आहे की, एक देश एक निवडणूक या धुळफेकीसाठी मोदी-शाहांच्या सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. त्या समितीत प्रख्यात कायदेपंडित हरीश साळवे यांची खास नियुक्ती करण्यात आली आहे.’

हे वाचलं का?

हेही वाचा >> Maratha Morcha : ‘माझी अंत्ययात्रा तरी निघेल नाहीतर मराठा समाजाला…’, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

शिवसेनेने (युबीटी) पुढे म्हटले आहे की, ‘एकतर साळवे हे मोदी यांचे चाहते आहेत, दुसरे म्हणजे साळवे यांना कायद्याचे ज्ञान व अनुभव प्रचंड आहे आणि मोदी सरकारला ते कायदेशीर गोष्टींत मदत करीत असतात. मोदी अडचणीत आले की, साळवे हे काळा डगला चढवून मोदींची बाजू मांडतात. महाराष्ट्रात भाजपने जे ‘घटनाबाह्य’ सरकार निर्माण केले व त्यास मोदी-शाहांचे आशीर्वाद लाभले. या प्रकरणात साळवे घटनाबाह्य सरकारची बाजू हिरिरीने मांडत आहेत.’

मोदींचा अमृतकाळा काळवंडला जाईल

‘अशा कायदेपंडितास ‘एक देश एक निवडणूक’ योजनेच्या समितीवर घेतले त्याबद्दल आश्चर्य वाटावे असे काहीच नाही, पण श्रीमान साळवे यांनी आता मोदी-शाहांच्या सरकारला संकटात ढकलले आहे. त्यामुळे मोदींचा अमृतकाल काळवंडला जाऊ शकतो.’

ADVERTISEMENT

मोदी-शाह चिअर्स करणार आहेत का?

ठाकरेंच्या शिवसेनेने पंतप्रधान मोदी, अमित शाहांना चिमटा काढला आहे. सामनात म्हटलंय की, ‘साळवे यांनी इंग्लंडमध्ये त्यांच्या विवाहाची ‘हॅटट्रिक’ केली. त्यांनी तिसरा विवाह केला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न झाला, पण साळवे यांनी त्यांच्या तिसऱ्या लग्नाच्या प्रीत्यर्थ जी मेजवानी दिली त्यात श्रीमान साळवे यांच्या सोबतीने हिंदुस्थानला हवा असलेला भगोडा ‘चिअर्स’ करताना दिसत आहे. यावर आता मोदी-शाहांचे काय म्हणणे आहे? की तेही दिल्लीत बसून साळवे-ललित मोदी जोडीस ‘चिअर्स’ करणार आहेत’, असा खोचक टोला ठाकरेंच्या सेनेने लगावला आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Amravati Murder : डोक्यात संशयाचं भूत शिरलं, युट्यूबर व्हिडिओ बघून आई-भावाला…

‘ललित मोदी, मोईन कुरेशी हे हिंदुस्थानातील आर्थिक गुह्यांचा तपास करणाऱ्या सर्वच तपास यंत्रणांना हवे आहेत व त्यात ‘ईडी’सुद्धा आहे. साधारण 4500 कोटींच्या आर्थिक हेराफेरी प्रकरणात ललित मोदी गुन्हेगार आहे. प्रकरण अर्थात मनी लॉण्डरिंगचे आहे. त्याच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे आणि तो आज ‘भगोडा’ आहे. असा हा देशाचा भगोडा लंडनमध्ये कायदेपंडित हरीश साळवे यांच्या मेजवानीत दिसतोय व त्याच हरीश साळवे यांना ‘वन नेशन वन इलेक्शन’ समितीत माजी राष्ट्रपती व गृहमंत्री अमित शाह यांच्या बरोबरीने स्थान मिळाले. याचा अर्थ असा की, भ्रष्टाचार उखडून काढू, परदेशात पळून गेलेल्या घोटाळेबाजांना फरफटत आणू, सर्व काळा पैसा परदेशांतून भारतात आणू या मोदींच्या फक्त थापाच थापा आहेत’, असं म्हणत शिवसेनेने (युबीटी) मोदींना लक्ष्य केलं आहे.

सगळेच मोदी चोर कसे? ठाकरेंच्या शिवसेनेने डिवचलं

‘आज देशाचे चित्र काय आहे? मोदी शाहांच्या माणसांबरोबर ‘भगोडा’ आरोपी ललित मोदी आरामात ‘चिअर्स’ करीत आहे. हा एक नवाच ‘सनातन धर्म’ भाजपने निर्माण केलेला दिसतोय. ‘सगळेच चोर मोदी कसे?’ या एका विधानावर राहुल गांधी यांची खासदारकी मोदी सरकारने रद्द केली, त्यांचे घर काढून घेतले, त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्या ‘चोर मंडळा’तील एक मोदी लंडनच्या पार्टीत ‘चिअर्स’ करताना संपूर्ण देशाने पाहिला. त्या मोदीला प्रेमालिंगन देणारे कायदेपंडित भारताच्या ‘एक देश एक निवडणूक’ समितीत बसतील तेव्हा देशाच्या भावना नेमक्या कशा असतील?’, असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे.

‘राहुल गांधी यांनी ‘सर्व मोदी चोर कसे?’ हे विधान करताच श्री. साळवे दुःखी झाले. राहुल गांधी यांचे विधान असंसदीय असल्याचे सांगून साळवे यांनी मोदींची (पंतप्रधान) बाजू घेतली त्यामागचे इंगित आता उघड झाले. पंतप्रधान मोदी यांनी जो नवा अमृतकाल निर्माण केला त्या अमृतकालाचे विष करणारा हा प्रकार आहे. मोदी व शाह यांना आता ललित मोदी-साळवे संबंधांवर संसदेत उत्तर द्यावे लागेल व उत्तर देताना भंबेरी उडेल म्हणून सत्ताधारी अमृतकालातले विशेष अधिवेशनही गोंधळ घालून बंद पाडतील.’

‘भाजप विरोधकांना खोट्या प्रकरणांत गोवणाऱ्या देशातील तपास यंत्रणा आता काय भूमिका घेणार? की ललित मोदीलाही स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र देऊन मोकळे होणार? मोदी सरकारला पाकिस्तानातून दाऊदला आणता आलेले नाही आणि ‘भगोडा’ गुन्हेगार तसेच ज्याच्याबाबत ‘लुक आऊट’ नोटीस जारी झाली आहे तो ललित मोदी समोर दिसत आहे, तोही केंद्र सरकारच्या वकिलांबरोबर ‘चिअर्स’ करताना. लोकांना मूर्ख बनविण्याचा हा धंदा आहे. सगळे चोर एक आहेत व चोरांचे सरदार दिल्लीचे सरकार चालवीत आहेत’, असा हल्लाबोल शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT