Uddhav Thackeray : 'जय श्री राम'ला 'जय भवानी-जय शिवाजी'ने उत्तर द्या... आक्रमक उद्धव ठाकरेंची नवी रणनीती

Maharashtra Politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. प्रकल्प बंद पाडणारा मी उद्धव ठाकरे नाही, असा टोला फडणवीसांनी मारला होता.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ठाकरे-फडणवीसांमध्ये पुन्हा उत्तर प्रत्युत्तर...

point

उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

point

मेट्रो प्रकल्पावरुनही ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray News: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल आपल्या भाषणातून भाजपवर निशाणा साधला. भाजप समाजात विष कालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या ‘जय श्री राम’ या घोषणेला ‘जय शिवाजी’ आणि ‘जय भवानी’च्या घोषणांनी प्रत्युत्तर देण्याचं आवाहनही उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. उद्धव ठाकरे यांनी रविवारी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना आक्रमक भूमिका घेतल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा >> Pune: भर चौकात नको ते करणाऱ्या गौरव अहुजाची कुंडलीच आली समोर, हा तर...

'जय श्री राम'ला 'जय भवानी-जय शिवाजी'ने उत्तर द्या...

उद्धव ठाकरे म्हणाले, "कोणी 'जय श्री राम' म्हणत असेल तर त्याला 'जय भवानी-जय शिवाजी' म्हणत उत्तर द्या. भाजपने आमच्या समाजात विष कालवलं आहे. भाजप नेत्यांनी कधीकाळी पाकिस्तानसोबतच्या सामन्यांना विरोध केला होता आणि आज तेच भारत पाकिस्तान आणि भारत बांगलादेश असे क्रिकेट सामने खेळवतायत. अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमधून ठाकरेंनी भाजप सरकारवर हल्ला केला.

उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही काळात आपल्या पक्षात अनेक गोष्टींमध्ये बदल केलेले पाहायला मिळतायत. त्यामुळेच नेहमी 'जायचं त्या जा' म्हणणारे उद्धव ठाकरे 'बटेंगे नहीं, कटेंगे नहीं, फुटेंगे नहीं' असं म्हणताना दिसले आहेत.

फडणवीस-ठाकरेंमध्ये वाद कशावरुन? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच विधानसभेत उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. प्रकल्प बंद पाडणारा मी उद्धव ठाकरे नाही, असा टोला फडणवीसांनी मारला होता. फडणवीसांवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, फडणवीसांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करुन दाखवावी. त्यामुळे आता आज महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर होताना सर्वसामान्यांना काय मिळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

हे ही वाचा >> बाळा नांदगावकरांनी कुंभमेळ्यातून आणलेलं गंगेचं पाणी Raj Thackeray का प्यायले नाहीत? कारण वाचून लोटपोट हसाल

शिवभोजन, कन्या भगिनी योजना यांसारख्या कार्यक्रमांसाठी बजेटमध्ये सुधारित निधीची तरतूद करावी, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र राज्याचा वार्षिक अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधानसभेत सादर होणार आहे.

मेट्रो कारशेडबाबत उद्धव-फडणवीस यांच्यात मतभेद!

उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या कार्यकाळात काही प्रकल्प बंद केले. तसंच ते आपण अधिक काळ या पदावर राहिलो असतो, तर मेट्रो 3 कारशेड कांजूर मार्गावर हलवलं असतं. मात्र, आता ती जमीन भाजप सरकार अदानी समूहाला देत जात असल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी कला.

मुंबई मेट्रो 3 कारशेडच्या जागेवरून भाजप आणि ठाकरे यांच्या पक्षात नेहमीच मतभेद आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे 2022 मध्ये ठाकरेंचे महा विकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर, भाजप पुन्हा सत्तेत आला आणि नवीन सरकारने पश्चिम उपनगरातील आरे येथे मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp