Uddhav Thackeray: ‘माझ्या वडिलांना चोरलं, तुमच्या दिल्लीतल्या वडीलांमध्ये..’, ठाकरे संतापले!

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

uddhav thackeray criticize cm eknath shinde devendra fadnavis on hingoli maharashtra politics
uddhav thackeray criticize cm eknath shinde devendra fadnavis on hingoli maharashtra politics
social share
google news

माझा पक्ष फोडलात, माझ्या वडीलांना चोरलंत, तुमच्या दिल्लीतल्या वडीलांमध्ये मत मागांयची हिम्मत नाही का? असा जोरदार हल्ला उद्वव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर चढवला आहे. यासोबतच उद्धव ठाकरेंनी भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे. (uddhav thackeray criticize cm eknath shinde devendra fadnavis on hingoli maharashtra politics)

ADVERTISEMENT

हिंगोलीत ठाकरे गटाची निर्धार सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संतोष बांगर आणि भाजपवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाषणाचा सुरुवातीलाच शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांवर टीका केली. ‘गद्दारांची आपण नाग समजून पुजा केली, पण हा उलटा फिरून डसायलाच लागला, अरे बाबा तुझ्यासाठी पुंगी वाजवली, दुध पाजलं, सगळ वाया गेलं’, अशा शब्दात ठाकरेंनी बांगरांचा समाचार घेतला. तसेच गदारांचा समाचार घेण्यास तुम्ही समर्थ आहात. पण आता सुद्धा काही गद्दार, बेंडकुळ्या दाखवतात, त्या बेडकुळ्यांना जे हवंय ती ताकद माझ्याकडे असल्याचे ठाकरेंनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा : Ajit Pawar: फडणवीसांसमोरच अजित पवारांची संभाजी भिडेंवर टीका, म्हणाले, ‘वाचाळवीर…’

भाजपचं हिंदुत्व नामर्दानगी

डबल इंजिन सरकार त्यात आणखीण एक डब्बा अजितदादांचा, अजून किती डब्बे लागणारं आहेत. जणू काय मालगाडी तयार करताय, असा टोला ठाकरेंनी सत्ताधारी महायुतीला लगावला. तुमच्या पक्षात काहीच कर्तृत्व नाही, तुम्हाला नेते बाहेरचे लागतात, वडील चोरावे लागतात…, तुमच्या दिल्लीतल्या वडिलांमध्ये मत मागायची हिमंत नाही, अशी टीका ठाकरेंनी शिंदेंवर केली आहे.माझ्या वडीलांना चोरणार, इतर पक्षातून नेते चोरणार आणि म्हणणार आम्ही हिंदू आहोत, आमची ताकद बघा, कसली ताकद याला नामर्द म्हणतात, ही नामर्दानगी आहे, ना स्वत:कडे काही विचार, आकार , ना उकार अशी टीका ठाकरेंनी भाजप-शिंदे गटावर केली आहे.

ठाकरेंनी सरकारच्या शासन आपल्या दारी या सरकारच्या उपक्रमाची देखील खिल्ली उडवली. सरकार आपल्या दारी, थापा मारते लयभारी, थापा मारणार सरकार आहे, थापाच थापा, अशा शब्दात ठाकरेंनी टीका केली. माझी सत्ता असताना योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या होत्या. जर या गद्दारांनी घात केला नसता तर माझ्या शेतकऱ्याचं आणखीण भलं केलं असतं, असे ठाकरे यांनी सांगितले.

हे ही वाचा : Devendra Fadnavis : ‘..आम्ही तिघंही स्वस्थ बसणार नाही’; फडणवीसांनी कोणाला ठणकावलं?

पंतप्रधान मोदींवर टीका

इंडिया आघाडी ही विरोधीपक्षाची नाही तर देशभक्तांची एकजूट आहे. पंतप्रधान मोदींनी इंडियाचा उल्लेख घमेंडिया केला, तुम्ही एनडीए आहात ना, मग तुम्ही घमेंएनडीए आहात, म्हणजेच गर्विष्ठ आहात, अशी टीका ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केली. तसेच इंडियाची तुलना तुम्ही इंडियन मुजाहीद्दीनशी करता. इकडे सगळे जमलेले काय अतिरेकी आहेत, माझे विचार ऐकायला आलेले अतिरेकी आहे, असा देखील हल्ला ठाकरेंनी मोदींवर चढवला.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT