BRS : तेलंगणात एकहाती सत्ता, आता महाराष्ट्रावर नजर; कोण आहेत केसीआर?
केसीआर महाराष्ट्रात आपली ताकद दाखवतायेत. त्यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने विठुरायाचं दर्शन देखील घेतलं आहे. त्यांनी त्यांच्यासोबत आणलेल्या 600 गाड्यांनी सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
ADVERTISEMENT
Who Is KCR : तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास माहित असेलच. भाषावार प्रांत रचना करण्याचे ठरल्यानंतर भाषेनुसार राज्य स्थापन करण्यात आली. तत्कालिन सरकारने मुंबईला मात्र केंद्रशासित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या विरोधात मोठं आंदोलन उभं राहिलं, मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणा होऊ लागली. 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला.
ADVERTISEMENT
आता तुम्ही म्हणाल ही सगळी कहाणी आम्हाला माहिती आहेच की, पुन्हा का सांगताय. ही कहाणी पुन्हा सांगण्यामागचं कारण म्हणजे महाराष्ट्रासारखाच लढा स्वतंत्र तेलंगणा राज्य मिळावं म्हणून एक नेता लढत होता. अखेर या नेत्याच्या आंदोलनापुढे केंद्राला झुकावं लागलं आणि स्वतंत्र तेलंगणा राज्याची स्थापना करण्यात आली. या नेत्याचं नाव आहे, कल्वकुंतला चंद्रशेखर राव, ज्यांना देशात केसीआर म्हणून ओळखलं जातं.
महाराष्ट्रात पाऊल रोवण्याचे प्रयत्न
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नाका नाक्यावर भलेमोठे फ्लेक्स दिसतायेत. त्या फ्लेक्सवर लिहीलंय ‘अब की मार किसान सरकार’, आता हे फेक्स महाराष्ट्रातील कुठल्या नेत्याचे नाहियेत हे फ्लेक्स आहेत, भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचे. केसीआर महाराष्ट्रात आपली ताकद दाखवतायेत. त्यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने विठुरायाचं दर्शन देखील घेतलं आहे. त्यांनी त्यांच्यासोबत आणलेल्या 600 गाड्यांनी सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. महाराष्ट्रात एवढं मोठं शक्तिप्रदर्शन करणारे केसीआर नेमके कोण आहेत?
हे वाचलं का?
के. चंद्रशेखर राव यांचा राजकीय प्रवास
कल्वकुंतला चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1954 साली झाला. तेलगु लिट्रेचरमध्ये त्यांनी मास्टर्स डिग्री घेतली आहे. 1970 साली युथ काँग्रेसमधून राव यांची राजकीय कारकिर्द सुरु झाली. पुढे 1983 मध्ये राव रांनी तेलगु देसम पार्टीमध्ये प्रवेश केला. 1985 ते 2004 या काळामध्ये ते आंध्रप्रदेशच्या विधानसभेत आमदार होते. या काळात त्यांनी राज्यमंत्री पद तसेच कॅबिनेट मंत्री पद देखील भूषवलं आहे. 1999 ते 2001 या काळात आंध्रप्रदेशच्या विधानसभेचे ते उपाध्यक्ष होते.
हेही वाचा >> मविआ की युती… महाराष्ट्रात बीआरएस, वंचित बहुजन आघाडी कुणासाठी घातक?
27 एप्रिलल 2001 ला त्यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आणि तेलंगणा देसम पार्टीमधून देखील ते बाहेर पडले. पुढे त्यांनी स्वतंत्र तेलंगणासाठी तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाची स्थापना केली. पुढे ते खासदार झाले आणि युपीए सरकारच्या काळात ते केंद्रात मंत्री देखील झाले.
ADVERTISEMENT
स्वतंत्र तेलंगणाची मागणी आणि पहिले मुख्यमंत्री
स्वतंत्र तेलंगणाची मागणी मान्य न झाल्याने त्यांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला. 2009 साली स्वतंत्र तेलंगणाच्या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरु केलं. त्यांनतर 9 डिसेंबर 2009 साली तात्कालिन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी स्वतंत्र तेलंगणा राज्य तयार करण्याची प्रक्रिया सुरु केल्याचे जाहीर केले. परंतु स्वतंत्र तेलंगणाची स्थापना मात्र करण्यात आली नाही.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Lok Sabha 2024 : नितीश कुमार पहिली परीक्षा पास, 1998 सारखा चमत्कार होणार?
त्यानंतरही केसीआर यांचा स्वतंत्र तेलंगणासाठीचा लढा सुरुच होता, 2013 साली लोकसभा आणि राज्यसभेत स्वतंत्र तेलंगणा राज्य करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पुढे लगेचच 2014 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये केसीआर यांच्या पक्षाने 119 पैकी 63 जागांवर विजय मिळवला. आणि केसीआर यांनी तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
टीआरएसचे नामकरण बीआरएस
त्यानंतर केसीआर यांनी मागे वळून पाहिले नाही. 2018 च्या निवडणुकीमध्ये 119 पैकी तब्बाल 88 जागांवर केसीआर यांच्या पक्षाने विजय मिळवला आणि केसीआर यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पुढे त्यांनी त्यांच्या तेलगु राष्ट्र समितीचे नामकरण भारत राष्ट्र समिती असे केले. तेलंगणा राज्य स्थापन झाल्यानंतर केसीआर यांनी नावाला देखील विरोधपक्ष त्यांच्या राज्यात ठेवला नाही.
हेही वाचा >> ‘…म्हणून शरद पवार अस्वस्थ’, ‘त्या’ घटनेवर फडणवीसांनी काय दिलं उत्तर?
तेलंगणात आपल्या गडाला कोणी सुरुंग लावणार नाही याची खात्री झाल्यानंतर केसीआर यांनी आता आपला मोर्चा राष्ट्रीय राजकारणाकडे वळवला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे केसीआर महाराष्ट्रात करत असलेले शक्तिप्रदर्शन. थेट 600 गाड्यांच्या ताफ्यासह केसीआर महाराष्ट्रात दाखल झाल्याने त्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. त्यामुळे त्यांच्या या शक्तिप्रदर्शनाचा येत्या निवडणुकांमध्ये काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT