IND Vs PAK Asia Cup 2023: इंडिया पाकिस्तानवर करणार हल्लाबोल, आज हे विक्रम होणार…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Asia cup 2023 virat kohli rohit sharma match pallekele ground
Asia cup 2023 virat kohli rohit sharma match pallekele ground
social share
google news

IND Vs PAK Asia Cup 2023: आज भारतातीलच नाही तर साऱ्या जगातील क्रिडाप्रेमींचे लक्ष भारत-पाकिस्तान सामन्याकडे लागून राहिले आहे. तसेच आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) मधील सामने भारतीय क्रिकेट संघ आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करणार आहे. दोन्ही संघामधील हा आजचा ब्लॉकबस्टर सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 3 वाजता होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाची जबाबदारी रोहित शर्माच्या खांद्यावर असणार तर बाबर आझमकडे पाकिस्तानच्या संघाची धुरा असणार आहे.

ADVERTISEMENT

वेगवान आक्रमणाचा सामना

भारत-पाकिस्तान संघाचा सामना एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या ड्रेस रिहर्सलसारखा असणार आहे. ज्यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे अनुभवी फलंदाज असणार तर हरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या जबरदस्त वेगवान आक्रमणाचा सामना करणार आहेत.

हे ही वाचा >>Saurabh Ganguly: ‘भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होईल’ परवेझ मुशर्रफ, सौरभ गांगुलीला असं का म्हणाले होते?

लोकप्रियतेची संधी

गेल्या वर्षीच्या T20 विश्वचषकावेळी हरिस रौफच्या चेंडूवर कोहलीने मारलेला शानदार फटका अजूनही भारतीय क्रिकेट चाहत्यांना आठवत असेल. तर त्याचवेळी आफ्रिदीच्या वेगवान चेंडूचा सामना करण्यात शाहीनही अपयशी ठरला होता. तर रोहित एलबीडब्ल्यू आऊट झाला होता. खेळाडूंच्या या कामगिरीमुळेच खेळाडू दिग्गज बनतात, त्यामुळे आता आशिया चषक स्पर्धेत दोन्ही महासंघाच्या स्टार खेळाडूंना देशात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचण्याची संधी मिळणार आहे.

हे वाचलं का?

आशा विक्रमवीर ठरण्याची

भारताचे स्टार खेळाडू कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांकडून जबरदस्त कामगिरी करतील अशी भारतीय चाहत्यांची अपेक्षा आहे. त्याच बरोबर या सामन्याच्या निमित्ताने या दोन्ही खेळाडूंना मोठे विक्रम करण्याची संधी असणार आहे. रोहित शर्माने या सामन्यात दोन षटकार मारले तर तो आशिया कपच्या वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनणार आहे. त्यामुळे सुरेश रैनालाही तो मागे टाकणार आहे, त्यानेही जोरदारपणे 18 षटकार ठोकले आहेत. तर दुसरीकडे रोहित आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये सचिन तेंडुलकरच्या अर्धशतकांचा विक्रमही गाठू शकतो. सचिन तेंडुलकर हा आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक अर्धशतकं करणारा भारतीय फलंदाज आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान भिडणार, ‘हे’ 3 मोठे विक्रम मोडणार!

धावांचा पाऊस

पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात विराट कोहली 36 धावा केल्यानंतर एक विशेष स्थान प्राप्त करणार आहे. कोहली आशिया कपच्या वनडे फॉरमॅटमध्ये धावांच्या बाबतीत महेंद्रसिंग धोनीलाही तो मागू टाकू शकतो. धोनीने आशिया कपच्या वनडे फॉरमॅटमध्ये एकूण 19 सामने खेळून 648 धावा केल्या होत्या. तर दुसरीकडे, कोहलीने आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत 11 सामने खेळले असून त्यात तीन शतके आणि एका अर्धशतकासह 613 धावा केल्या आहेत.

ADVERTISEMENT

वेगवान फलंदाज

या सामन्यात विराट कोहलीने 102 धावा केल्या तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 13,000 धावा करणारा फलंदाज बनणार आहे. कोहली या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकणार आहे. ज्याने 321 डावात ही कामगिरी केली होती. कोहलीने आतापर्यंत 265 एकदिवसीय डावांमध्ये 57.32 च्या सरासरीने 12898 धावा केल्या आहेत ज्यामध्ये 46 शतके आणि 65 अर्धशतकं झाली आहेत.

वेगवेगळे विक्रम होणार

या सामन्याच्या निमित्ताने वेगवेगळे विक्रम होणार असले तरी हवामान खात्याने मात्र शनिवारी पल्लेकेलेमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांच्या आशेवर पाणी फिरण्याची शक्यताही आहे. विराट, रोहित आणि शुबमन गिल हे त्रिकूट रौफ, शाहीन आणि नसीम शाह यांच्याविरुद्ध कडवी झुंज देतील, अशी प्रार्थना होत असणार आहे. हवामान पाहता पाकिस्तानी त्रिकुट पॉवरप्लेमध्ये धोकादायक ठरू शकतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT