Josh Hazlewood: विराट कोहलीच्या आरसीबीला IPL 2023 सुरू होण्याआधीच मोठा झटका
आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीगचा 16 हंगाम 31 मार्चपासून सुरू होत असून, आरसीबीच्या चाहत्यांसाठी त्यापूर्वीच एक वाईट बातमी समोर आली आहे. जाणून घ्या विराटच्या संघाचं नेमकं काय गणित बिघडलं
ADVERTISEMENT
IPL 2023: मुंबई: 31 मार्चपासून इंडियन प्रीमिअर लीग सुरुवात होत आहे. आयपीएल तोंडावर आलेली असताना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला एक मोठा झटका बसला आहे. विराट कोहलीच्या संघातील तेज गोलंदाज जोश हेजलवूडबद्दल एक अपडेट समोर आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार हेजलवूड दुखापतग्रस्त असून, त्यामुळे आयपीलएलच्या सुरुवातीचे काही सामने आरसीबीकडून खेळू शकणार नाही.
ADVERTISEMENT
हेही वाचा – IPL 2023 : चेन्नई-गुजरात भिडणार! 31 मार्चपासून IPL, फायनल कोणत्या तारखेला?
क्रिकेट डॉट कॉम एयूने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड अजूनही एकिलिसने त्रस्त आहे. त्यामुळेच हेजलवूड भारताविरुद्धची बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका खेळू शकला नाही. हेजलवूड अजूनही फीट झालेला नाही, त्यामुळे आयपीएलच्या सुरूवातीच्या सामन्यांमध्ये हेजलवूड खेळताना दिसणार नाही.
मॅक्सवेल खेळण्याची शक्यता कमीच
32 वर्षीय ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज हेजलवूडला आयपीएलमध्ये खेळण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या मेडिकल स्टाफचा सल्ला घ्यावा लागणार आहे. हेजलवूडबरोबरच ऑस्ट्रेलिया अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलही अजून खेळण्यास सज्ज नाही.
हे वाचलं का?
हेही वाचा – यंदा IPLमध्ये चेन्नईला हलक्यात घेणं महागात पडेल; यामुळे आहे संघ मजबूत
ग्लेन मॅक्सवेलच्या पायाला जखम झालेली असून, त्यामुळे तो भारताविरुद्ध एकच एकदिवसीय सामना खेळाडू शकला होता. त्यामुळे दोन एप्रिल रोजी आरसीबी आणि मुंबई इंडियन्स सामना होणार असून त्यात मॅक्सवेल खेळण्याची शक्यता कमीच आहे. आयपीएल 2023 च्या हंगामात मॅक्सवेल आरसीबी संघाकडून खेळणार असून, त्यापूर्वीच त्याने सांगितलं होतं की, पुनरागमन करण्यास अनेक महिने लागतील.
आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचे आरसीबीचे स्वप्न
यंदाच्या हंगामात फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबी आयपीएलमध्ये खेळणार आहे. सध्या आरसीबीसमोर दोन मोठी आव्हाने आहेत. त्यामुळे आता बघाव लागले की, आरसीबीचे टीम व्यवस्थापन जोश हेजलवूड आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या जागेवर कुणाला संधी देणार, हे बघाव लागेल. 15 वर्षांपासून आरसीबीला एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकता आलेले नाही. त्यामुळे यावेळी आरसीबीकडून हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न होताना दिसेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT