Rohit Sharma IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडणार? समोर आली मोठी अपडेट

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Will Rohit Sharma leave Mumbai Indians? The biggest change in IPL will happen through trade
Will Rohit Sharma leave Mumbai Indians? The biggest change in IPL will happen through trade
social share
google news

Rohit Sharma IPL auction 2024 : आयपीएलचा 2024 चा मिनी लिलाव 19 डिसेंबर रोजी संपन्न झाला. यात सर्वच IPL संघ मालकांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. लिलावानंतर आता असे प्रश्न उपस्थित होताहेत की, ट्रेड विंडो उघडल्यानंतर मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा संघ सोडू शकतो का? आता या संपूर्ण प्रकरणावर एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Rohit Sharma Latest News Today)

ADVERTISEMENT

मुंबई इंडियन्सशी संबंधित एका अधिकाऱ्याने ‘क्रिकबझ’ या क्रिकेट वेबसाइटला सांगितले की, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्याबाबत मीडियामध्ये अनावश्यक बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ते कुठेही जाणार नाही. मुंबई इंडियन्स या सर्व खेळाडूंना सोबत ठेवणार आहे.

या अधिकाऱ्याने असेही सांगितले की, हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व खेळाडूंची संमती घेण्यात आली होती, ज्यामध्ये स्वतः रोहितचाही समावेश होता. त्यामुळे इतर सर्व गोष्टी निराधार आहेत. प्रत्येक खेळाडूने हा निर्णय मान्य केला आहे.

हे वाचलं का?

पांड्या कर्णधार होताच रोहितच्या भवितव्याबद्दल उपस्थित झाले प्रश्न

मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्स संघाचा माजी कर्णधार हार्दिक पांड्याला विकत घेतले. तो आता मुंबईचा कर्णधार असेल. पांड्याला खरेदी केलं गेल्यानंतर तो मुंबईचा कर्णधार होऊ शकतो अशा अनेक बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या. रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यावर मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनाने ही घोषणा रोहितला करू देण्याऐवजी स्वतः केली. त्यानंतर अनेक चाहते संतापले आहेत.

हेही वाचा >> ‘मी शपथ घेतो तेव्हा ती पूर्ण करतोच.. दीड वर्षांपूर्वी…’, CM शिंदेंचा विधानसभेत मोठा गौप्यस्फोट

2013 पासून कर्णधारपद भूषवत रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली. ज्या पद्धतीने रोहितकडून कर्णधारपद घेतले गेले, त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ रोहित शर्माला विकत घेण्याची इच्छा असल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले. आता या फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने या सर्व वृत्तांना पूर्णविराम दिला आहे.

ADVERTISEMENT

भारतीय संघाचा माजी खेळाडू एस बद्रीनाथने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये रोहित चेन्नई सुपर किंग्जचा टी-शर्ट परिधान केलेला दिसत होता. त्यात त्यांनी लिहिले होते की असे झाले तर काय होईल?

ADVERTISEMENT

काय आहे आयपीएल ट्रेड विंडोचा नियम?

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले गेले आहे की, बुधवारी (20 डिसेंबर) ट्रेड विंडो उघडल्यानंतर काही खेळाडू वेगवेगळ्या फ्रँचायझींसोबत व्यवहार करू इच्छितात. आयपीएलच्या नियमांनुसार, लीग सुरू होण्याच्या 30 दिवस आधीपर्यंत विंडो उघडी राहील. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या अशा फ्रँचायझी आहेत, जे त्यांच्या संघात MI च्या खेळाडूंचा समावेश करण्याचा विचार करत आहेत. रोहितचा देखील त्यात समावेश आहे.

हेही वाचा >> मल्लिका सागरकडून मोठी चूक, RCB ला बसला ‘इतक्या’ लाखांचा फटका

मात्र, चेन्नईने हे वृत्त फेटाळून लावले आहे. फ्रँचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी लिलावाच्या दरम्यान या वेबसाइटला सांगितले, “तत्त्वानुसार, आम्ही खेळाडूंचा व्यापार करत नाही आणि आमच्याकडे मुंबई इंडियन्ससोबत खरेदी-विक्री करण्यासाठी खेळाडूही नाहीत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला नाही आणि आमचा हेतूही नाही”, असे सांगत चेन्नई संघ मुंबईच्या खेळाडूंची विक्री करू पाहत असल्याच्या मीडिया वृत्तांचे त्यांनी खंडन केले.

रोहितचा खराब फॉर्म ठरला कर्णधारपदावरून हटवण्याचे कारण?

आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात रोहितचा फॉर्म खूपच खराब राहिला आहे. रोहितने 2023 IPL मध्ये 16 सामन्यात 20.75 च्या सरासरीने आणि 132.80 च्या स्ट्राईक रेटने 332 धावा केल्या. 2022 मध्ये, त्याने 14 सामन्यांमध्ये 19.14 च्या सरासरीने आणि 120.18 च्या स्ट्राइक रेटने 268 धावा केल्या. रोहितच्या फॉर्ममध्ये सरासरीच्या बाबतीत निश्चित घसरण झाली आहे.

रोहितच्या बाबतीत सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सला सांगितले की, आपण बरोबर आणि चुकीमध्ये जाऊ नये. पण, त्यांनी घेतलेला निर्णय संघाच्या हिताचा आहे. गेल्या दोन वर्षांत रोहितचे फलंदाजीतील योगदान थोडे कमी झाले आहे. पूर्वी तो भरपूर धावा करायचा. 2023 वगळता मागील दोन वर्षांत तो 9व्या किंवा 10व्या क्रमांकावर राहिला आणि शेवटच्या वर्षी तो प्लेऑफसाठी पात्र ठरला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT