India vs Pakistan : “मोदी साहेबांना माझी विनंती…;” शाहिद आफ्रिदीचं मोठं विधान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Shahid Afridi India vs Pakistan :

क्रिकेट विश्वात भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या दोन संघांच्या क्रिकेट (Cricket) सामन्याची दोन्ही देशातील प्रेक्षक कायमचं वाट बघतं असतात. मात्र ताणलेल्या राजकीय संबंधांमुळे या दोन्ही देशांदरम्यान मागील 11 वर्षांपासून द्विपक्षीय मालिका झालेली नाही. भारत आणि पाकिस्तानचे संघ केवळ आयसीसी स्पर्धेतच आमनेसामने येत आहेत. (Former Pakistan captain Shahid Afridi has appealed to Indian Prime Minister Narendra Modi)

ADVERTISEMENT

अशात आता पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने याबाबत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेटला परवानगी द्यावी, अशी विनंती त्याने पंतप्रधान मोदींना केली. कतारमधील दोहा येथे लीजेंड लीग क्रिकेट स्पर्धा नुकतीच पार पडली. यात आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील आशिया लायन्सने वर्ल्ड जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. या सामन्यानंतर आफ्रिदीने मीडियाशी संवाद साधला.

‘भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट होऊ द्या’ : आफ्रिदीची विनंती

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना आफ्रिदी म्हणाला, ‘मी मोदींना विनंती करतो की, दोन्ही देशांमध्ये (भारत आणि पाकिस्तान) क्रिकेट होऊ द्या. दोन्ही देशांमधील संबंधांवर तो म्हणाला की, ”जर आपल्याला एखाद्याशी मैत्री करायची असेल आणि तो आपल्याशी बोलतच नसेल तर आपण यात काय करू शकतो.”

हे वाचलं का?

मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीत जाणार? देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिका

BCCI हा एक अतिशय ताकदवान बोर्ड आहे. पण तुम्ही शक्तिशाली असता तेव्हाच तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्या असतात. तुम्ही खूप शत्रू बनवण्याचा प्रयत्न करत नाही. तुम्हाला मित्रांची गरज असते. जेव्हा तुम्ही जास्त मित्र बनवता तेव्हा तुम्ही अधिक ताकदवान होता.

ADVERTISEMENT

भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये डोक्यावर घेऊ :

आशिया चषकाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना आफ्रिदी म्हणाला, ”आशिया कपसाठी कोण नकार देत आहे? भारत नकार देत आहे. पण तुम्ही भारतीय संघ पाठवलात तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊ. ‘यापूर्वी मुंबईतील एका भारतीयाने पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येऊ देणार नाही, अशी धमकी दिली होती. पण आमच्या सरकारने ती जबाबदारीने घेतली आणि आम्ही भारताच्या दौऱ्यावर निघालो. त्यामुळे अशा धमक्यांचा आपल्या संबंधांवर परिणाम होऊ नये. धोके तर कायमच असणार आहेत.

ADVERTISEMENT

पालखी महामार्गात जाणार होतं छत, बारामतीच्या पठ्ठ्याने अख्खं घरचं उचललं

2012 पासून भारत-पाकिस्तान मालिका झालेली नाही :

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका (कसोटी, एकदिवसीय, T20) डिसेंबर 2012 मध्ये खेळवली गेली होती. तेव्हा पाकिस्तान संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता आणि दोन्ही संघांमध्ये 2 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली. टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत होती. तर एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने 2-1 ने विजय मिळवला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT