Mohammad Shami : सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर मोहम्मद शमीने सोडलं मौन

मुंबई तक

ADVERTISEMENT

mohammad shami reaction on sania mirza marriagemarriage rumour team india cricketer
लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाच मोहम्मद शमीने मौन सोडलं आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

फोन उघडल्यावर तुम्हाला तुमचाच फोटो दिसतो

point

मी सध्या स्वत:च्या फिटनेसवर लक्ष देत आहे.

point

अफवा पसरवणाऱ्यांना त्याने चांगलेच सुनावले

Mohammed Shami & Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक विभक्त झाले आहेत. यानंतर सानिया मिर्झाचे नाव अनेकदा टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीसोबत (Mohammed Shami) जोडलं गेलं होतं. दोघेही लग्नाच्या बेडीत अडकतील अशी चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांवर आता पहिल्यांदाच मोहम्मद शमीने मौन सोडलं आहे. नेमकं तो काय म्हणाला आहे? हे जाणून घेऊयात. (mohammad shami reaction on sania mirza marriage rumour team india cricketer) 

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शुभांकर मिश्राच्या युट्यूब चॅनलवर बोलत होता. यावेळी शमीने सानिया मिर्झासोबतच्या लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. मी एकटा खूप आनंदी आहे आणि स्वत:च्या फिटनेसवर लक्ष देत आहे. तसेच लग्नाबाबत अफवा पसरवणाऱ्यांना त्याने चांगलेच सुनावले आहे. 

हे ही वाचा : Pune Accident : भरधाव कारने जोडप्याला उडवलं, थरकाप उडवणारा व्हिडिओ

लग्नाच्या चर्चांवर शमी म्हणाला की, अगदी विचित्र आहे. फोन उघडल्यावर तुम्हाला तुमचाच फोटो दिसतो, पण मला एकच सांगायचे आहे की हे कोणी करू नये. सोशल मीडियावर जबाबदारीने वागले पाहिजे आणि अशा बिनबुडाच्या बातम्या पसरवणे टाळले पाहिजे, असे 
आवाहन शमीने नेटकऱ्यांना केले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मीम्स ही खिल्ली उडवण्यासाठी असतात हे मला मान्य आहे, पण जर ते एखाद्याच्या आयुष्याशी संबंधित असतील तर तुम्ही मीम्स खूप विचारपूर्वक बनवाव्यात, असा सल्ला देखील शमीने नेटकऱ्यांना दिला आहे. 

तसेच तुम्ही व्हेरिफाईड पेज नाही आहात, तुमचा पत्ता माहीत नाही, तुम्हाला कोणी ओळखत नसेल तर तुम्ही बोलू शकता, पण मला एकच सांगायचे आहे, तुमच्यात हिम्मत असेल तर व्हेरिफाईड पेजवरून बोलून दाखवा, मग तुम्ही किती पाण्यात आहात ते आम्ही सांगू, असे थेट आव्हानच शमीने नेटकऱ्यांना दिले आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maharashtra Vidhan Sabha : अजित पवारांच्या 'राष्ट्रवादी'बद्दल भाजपचं काय ठरलं?

दुसऱ्यांचे पाय खेचणे सोप्पे आहे. पण तुम्ही यशस्वी होऊन दाखवा. तुमली लेव्हल वाढवून दाखवा. कुटुंबाला एकत्र घेऊन चालुन दाखवा. चार लोकांचे भविष्य चांगले करून दाखवा. शमी म्हणतो की इतरांचे पाय खेचणे सोपे आहे. काही यश दाखवा. तुमची पातळी थोडी वाढवा. तुमच्या कुटुंबाला तुमचा पाठिंबा दर्शवा. चार लोकांसाठी चांगले भविष्य दाखवा. दुसऱ्यांची खिल्ली उडवताना तुम्हाला किती समज आहे हे दाखवा. मग ते त्याला एक चांगला माणूस मानतील, असे देखील मोहम्मद शमी म्हणाला आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT