World Cup 2023: टीम इंडियाची घोषणा होताच शिखर धवनसह ‘यांचंही’ भंगले स्वप्न
भारतीय संघाची वर्ल्ड कप 2023 साठी संघाची बीसीसीआयने घोषणा केली असली तरी शिखर धवनसह तीन खेळाडूंना संघाबाहेर ठेवल्याने क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. विश्वचषकाचे खरे दावेदार समजल्या जाणाऱ्या चार खेळाडूंनाच संघातून डावलण्यात आल्याने खेळाडूंचे स्वप्न भंगले आहे.
ADVERTISEMENT
Cricket Team: भारतीय संघाने नुकताच आशिया कप 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. त्यामुळे आता येणारे पुढील वर्ष भारतीय संघासाठी महत्वाचे आहे. कारण भविष्यात आता आशियाई सामना आणि वन डे वर्ल्ड कप 2023 (odi world cup 2023) ही खेळायचा आहे. त्यामुळे आता बीसीसीआयनेही भारतीय संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयकडून संघ जाहीर करण्यात आला असला तरी विश्वचषकाचे खरे दावेदार समजल्या जाणाऱ्या चार खेळाडूंनाच संघातून डावलण्यात आले आहे. त्यांच्यासाठी वर्ल्ड कपही आता दूर राहिला आहे. (odi world cup 2023 and asian games indian cricketer out to shikhar dhawan yuzvendra chahal sanju samson bhuvneshwar kumar)
ADVERTISEMENT
भारतीय संघात धक्कादायक म्हणजे ज्याला सलामीवीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनलाही दोन्ही संघातून बाजूला ठेवण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी धवनकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याला डावलून आता ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद देण्यात आले आहे.
हे ही वाचा >> आमदार अपात्रतेबाबतच्या हालचालींना वेग, राहुल नार्वेकरांनी दिले मोठे संकेत
शिखर धवनला धक्का
शिखर धवनला संघातून बाजूला ठेवल्यानंतर त्याने माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, बीसीसीआयच्या निर्णयाचा मलाही धक्का बसला होता. मात्र आता बीसीसीआयने माझा काही तरी वेगळा विचार केला असेल असं वाटलं. त्यातच ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद देण्यात आल्याने त्या गोष्टीचा आनंदच आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
फिरकीपटूच संघाबाहेर
ज्या प्रमाणे शिखर धवनला संघातून बाजूला ठेवल्यानंतर त्याच्याप्रमाणेच अनेका क्रिकेटप्रेमींना धक्का बसला होता. त्याच प्रमाणे युजवेंद्र चहलही बाजूला गेल्याने अनेकांना धक्का बसला आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहलची अवस्थाही अशीच आहे. आशिया चषकापूर्वी वेस्ट इंडिज दौऱ्यावर चहलचा वनडे मालिकेत समावेश केला होता मात्र त्यानंतर त्याची विश्वचषकसाठीही त्याची निवड होईल अशी शक्यता होती. मात्र विश्वचषकाबरोबरच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठीही त्याची निवड करण्यात आली नव्हती. तर आशियाई स्पर्धेतूनही त्याला बाहेर ठेवण्यात आले होते.
संजू सॅमसनही आऊट
त्यातच संजू सॅमसनही क्रिकेटच्या विश्वात तो स्वतःला सिद्ध करू शकला नाही. त्यामुळे संजू सॅमसनसाठी विश्वचषकाचे दरवाजे बंद करण्यात आले. तसेच त्याला आशियाई सामन्यातूनही बाहेर काढण्यात आले.
ADVERTISEMENT
बीसीसीआयचे दुर्लक्ष
भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर संघातून अचानक गायब झाल्यानेही अनेकांना धक्का बसला होता. भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघासाठी आधार वाटत होता. त्याने 121 एकदिवसीय सामन्यात 141 विकेट घेतल्या आहेत. 2021 च्या अखेरीपर्यंत त्याने अनेक एकदिवसीय सामन्यात आपला खेळ केला होता, मात्र त्याच दरम्यान त्याचा फॉर्म खराब झाला आणि बीसीसीआयने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.
ADVERTISEMENT
वर्ल्ड कप 2023 साठीची इंडियाची टीम:
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मो. शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.
हे ही वाचा >>Chandrayaan 3 ची मोठी बातमी, सिग्नलबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा
19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघ:
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग. (यष्टीरक्षक).
स्टँडबाय खेळाडू: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.
ADVERTISEMENT