आधी उल-हक, आता गंभीर... Virat Kohli ने मिटवले सर्व मतभेद; काय आहे 'मैत्री'ची इनसाइड स्टोरी?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 17 व्या सिझनमधील 10 व्या सामन्यात, कोलकाता नाइट रायडर्स (KKR) ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा सात गडी राखून पराभव केला. कोलकाता नाईट रायडर्सचा हा सलग दुसरा विजय ठरला. याआधी KKR ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धचा पहिला सामना 4 धावांनी जिंकला होता. दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव ठरला. (rcb vs kkr match IPL 2024 Virat Kohli friendship With Gautam Gambhir and Naveen ul haq)

ADVERTISEMENT

कोहली-गंभीरने चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का!

या सामन्यात कोलकात्याच्या विजयापेक्षा आणि आरसीबीच्या पराभवापेक्षा विराट कोहली आणि गौतम गंभीरची प्रचंड चर्चा होत आहे. दोघांमधील असलेले मतभेद हे सर्वांनाच माहित होते परंतु शुक्रवारी (29 मार्च) बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर जे काही घडलं ते चाहत्यांसाठी एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नव्हतं.

आरसीबीच्या डावातील 16 व्या षटकाच्या समाप्तीनंतर टाइम आऊट दरम्यान, KKR टीमचा मेंटॉर गौतम गंभीर देखील त्याच्या खेळाडूंशी चर्चा करण्यासाठी मैदानात आला होता. दुसरीकडे कोहलीही टीमोबत बोलण्यात व्यस्त असताना गंभीर त्याच्या जवळून गेला. यावेळी चाहत्यांना वाटलं होतं की, गंभीर-कोहली गेल्या IPL प्रमाणेच राडा घालतील पण पुढे जे काही घडलं ते पाहण्यासारखं होतं.

हे वाचलं का?

गौतम गंभीरने आधी विराट कोहलीसोबत हात मिळवला आणि नंतर त्याला मिठी मारली. यावेळी दोघांमध्ये काही संवादही झाला. दोन्ही दिग्गजांच्या चेहऱ्यावर हसूही दिसले. हे सर्व पाहून सगळेच थक्क झाले होते. हा सामना सुरू होण्यापूर्वीच या दोघांमधील 'वैर' फार काळ टिकणार नसल्याचे काही संकेत मिळत होते. कोलकाता नाइट रायडर्सने सामन्यापूर्वीचा फोटो शेअर केला होता. त्यात गौतम गंभीर आणि विराट कोहली दिसले होते. फोटोमध्ये कोहली गंभीरकडे शांतपणे पाहताना दिसला होता. 

जेव्हा कोहलीचं गंभीर आणि नवीन उल-हकसोबत झालं होतं 'तू-तू, मैं-मैं'...

1 मे 2023 नंतर गंभीर-कोहली यांची ही पहिलीच भेट ठरली. या भेटीमुळे हे मतभेद पूर्णपणे संपुष्टात आले आहेत. लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) आणि आरसीबी यांच्यात गेल्या वर्षी 1 मे रोजी झालेला सामना विराट कोहली आणि नवीन उल-हक यांच्यातील लढतीबद्दल होता, त्यानंतर कोहली आणि गौतममध्ये 'तू-तू, मैं-मैं' झाली होती. तेव्हा लखनौचे स्टेडियम 'आखाडा' बनले होते. गंभीर आणि कोहली यांच्यात जोरदार बाचाबाची होती. या लढतीनंतर गौतम गंभीर आणि कोहलीला आयपीएलने त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला. तर नवीनच्या मॅच फीची 50 टक्के रक्कम कापण्यात आली होती.

ADVERTISEMENT

गेल्या विश्वचषकादरम्यान नवीन-कोहलीची मैत्री

त्या IPL सामन्यानंतर (1 मे 2023 चा सामना), विराट कोहली, नवीन उल हक, गौतम गंभीर यांच्याशी कधी आमनेसामने येतील याकडे अनेक चाहत्यांचं लक्ष होतं. 2023 च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान चाहत्यांची ही उत्सुकता पहिल्यांदा पूर्ण झाली, जेव्हा विराट कोहली आणि नवीन उल हक दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर एकमेकांसमोर आले. मात्र, त्यावेळी जे काही घडले ते चाहत्यांसाठी आश्चर्यापेक्षा कमी नव्हते. त्यानंतर नवीन उल हक आणि विराट कोहली यांच्यात मैत्री झाली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT