Rohit Sharma : रोहित वनडे आणि टेस्टमधून घेणार संन्यास? निवृत्तीवर सोडलं मौन
Rohit Sharma News : हिटमॅनच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरताच रोहितने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता रोहित शर्माच्या टेस्ट आणि वनडे क्रिकेटमधील निवृत्तीची चर्चा सुरु आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
रोहित शर्माच्या टेस्ट आणि वनडे क्रिकेटमधील निवृत्तीची चर्चा सुरु आहे.
रोहित शर्मा सध्या 37 वर्षांचा आहे.
रोहित शर्मा आणखीण किती काळ क्रिकेट खेळणार?
Rohit Sharma News : टीम इंडियाने नुकताच आयसीसी 2024 चा टी20 वर्ल्ड कप (Icc T20 World cup 2024) जिंकला होता. साऊथ आफ्रिकेचा अवघ्या 7 धावांनी पराभव करत टीम इंडियाने (Team India) हा वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. या दरम्यान एकीकडे टीम इंडिया वर्ल्ड कपचा आनंद साजरा करत असताना दुसरीकडे रोहित शर्माने (Rohit Sharma) टी20 क्रिकेटमधून निवृत्तीची जाहीर केली होती. रोहितच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा झटका बसला होता. त्यात आता रोहित वनडे आणि टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या वृत्तात किती तथ्य आहे? हे जाणून घेऊयात. (rohit sharma reaction on test and odi cricket retirement team india captain t20 world cup 2024)
ADVERTISEMENT
हिटमॅनच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कपवर नाव कोरताच रोहितने निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर आता रोहित शर्माच्या टेस्ट आणि वनडे क्रिकेटमधील निवृत्तीची चर्चा सुरु आहे. रोहित शर्मा सध्या 37 वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत तो आणखीण किती काळ क्रिकेट खेळतो? हा मोठा प्रश्न आहे. रोहित सध्या वेस्ट इंडीजमध्ये वर्ल्ड कप जिंकल्यापासून विश्रांतीवर आहे. श्रीलंकेविरूद्धच्या तीन वनडे सामन्याच्या मालिकेत देखील त्याला विश्रांती दिली आहे. त्यामुळे तो क्रिकेटच्या इतर फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा : Mukhyamantri Teerth Darshan Yojana : कोणाला करता येणार अर्ज? पात्रता, नियम आणि अटी काय?
निवृत्तीवर रोहित काय म्हणाला?
रोहित शर्माने या सर्व चर्चांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. रोहितच्या मनात सध्या निवृत्तीचा कोणताही विचार नाही आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्स त्याला मैदानात खेळताना पाहणार आहेत. रविवारी रोहित शर्माला एका कार्यक्रमात निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रोहित शर्मा म्हणाला की, ''मी तुम्हाला आताच सांगितले, मी इतक्या लांबचा विचार करत नाही. त्यामुळे तुम्ही मला आणखीण काही काळ मैदानात खेळताना पाहु शकता'', असे रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.
हे वाचलं का?
टी20 तून निवृत्ती घ्यावी लागणार मागे?
दरम्यान टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहितच्या कर्णधार पदावरून मोठं विधान केले होते. जय शाह यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओत जय शाह म्हणाले, गेल्या एका वर्षात ही आमची तिसरी फायनल होती. जून 23 मध्ये आम्ही डब्ल्यूटीसीमध्ये हरलो. नोव्हेंबर 23 मध्ये आम्ही मने जिंकली पण चषक जिंकू शकलो नव्हतो.पण मी राजकोटमध्ये म्हणालो होतो की, जून 24 मध्ये आम्ही हृदय, कप दोन्ही जिंकू आणि आमच्या कर्णधाराने ते करून दाखवले आहे. त्यामुळे आता पुढील WTC फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. त्यामुळे मला खात्री आहे रोहित शर्माच्या नेतृत्वात आम्ही पुढील या दोन्ही स्पर्धांमध्ये विजयी मिळवू, असा विश्वास जय शाह यांनी व्यक्त केला होता.
हे ही वाचा : Chhagan Bhujbal : शरद पवारांची भेट का घेतली? भुजबळांनी अखेर कारण केले उघड
दरम्यान जय शाहाच्या विधानानंतर WTC फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा निवृत्त मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवृत्ती मागे घेण्यावर आणि जय शाह यांच्या विधानावर रोहित शर्माने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT