Love Story Viral News : अलिगढच्या सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मागील पाच दिवसांपासून पोलीस या फरार प्रेमीयुगुलांचा शोध घेत आहेत. परंतु, सासू अनिता जावई राहुलसोबत कुठे पळून गेली आहे, याचा पोलिसांना अद्यापही थांगपत्ता लागलेला नाहीय. दोघांचंही लोकेशन ट्रेस होत नाहीय. दोघेही कुठे आहेत? याबाबत कोणालाही काही माहित नाहीय. मागील पाच रात्रींपासून सासू अनिता तिच्या होणारा जावई राहुलसोबत फरार आहे. दोघांना बेपत्ता होऊन 144 तास झाले आहेत. दोघेही पाच दिवस एकत्र राहिले आहेत. पण दोघे असे गायब झाले आहेत की पोलिसही त्यांना शोधू शकले नाहीत. दोघेही पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत आहेत.
ADVERTISEMENT
सासू अनिता अन् जावई राहुल एकमेकांना भेटायचे आणि...
रिपोर्ट्सनुसार, अनिताचा पती जितेंद्र आणि मुलगी शिवानीला या प्रकरणामुळं मोठा धक्का बसला आहे. पती जितेंद्र आणि मुलीने स्वत:ला घरात बंद करून घेतलं आहे. ते घरातून बाहेर येत नाहीयत. जितेंद्र यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.
अनिता आणि तिचा होणार जावई राहुल यांच्यात खूप दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरु होतं. दोघेही एकमेकांना भेटण्याची संधी शोधायचे.
हे ही वाचा >> पुण्यातील एकाला 2.5 कोटींचा गंडा; कनेक्शन थेट बीड, पाकिस्तान, दुबई नेपाळपर्यंत... प्रकरण काय?
जेव्हापासून अनिताने तिच्या मुलीचं लग्न राहुलसोबत फिक्स केलं होतं, तेव्हापासून ती होणारा जावई राहुलसोबत जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत होती. राहुलही अनितावर प्रेम करू लागला होता. दरम्यान, अनिता मागील दिवसांमध्ये राहुलच्या घरी गेली होती. तिथे ती पाच दिवस राहिली होती. अनिताने घरी सांगितलं होतं की, राहुल आजारी झाला आहे. अशातच ती त्याची काळजी घेण्यासाठी राहुलच्या घरी जात आहे. दोघांमध्ये काहीतरी शिजतय असा अंदाजही तोपर्यंत कोणी बांधू शकला नव्हता. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते.
हे ही वाचा >> "100 किलोचा माणूस टॉवेलने कसा फास घेऊ शकतो" आरोपी विशाल गवळीच्या कुटुंबाला घटनेवर संशय
पोलिसांनी कुठे कुठे केला तपास?
अलिगढ पोलीस दोघांनाही उत्तराखंडमध्येच शोधत आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की, सासू आणि जावई उत्तराखंडमध्येच लपले असावेत. दोघेही समोर येत नाहीयत. राहुल आधीपासूनच उत्तराखंडमध्ये नोकरी करत होता. अशातच पोलिसांना संशय आहे की, राहुल त्याच्या मित्रांच्या मदतीने त्याची सासू अनिताला उत्तराखंडमध्ये घेऊन गेला आहे.
ADVERTISEMENT
