आश्चर्यकारक! पायाचे फोटो दाखवून सोशल मीडियावर करते लाखोंची कमाई

मुंबई तक

• 12:59 PM • 04 Jul 2023

अशाच एका तरूणीची कहानी समोर आली आहे. ही तरूणी तिच्या पायांचे फोटो पोस्ट करून लाखोंची कमाई करते. नेमकी ही तरूणी कशी कमाई करतेय? तिचा हा सोशल मीडियावरचा हा कंटेंट काय आहे? हे जाणून घेऊयात.

a girl feet snaps earns more than 5 lakh per month social media content creator

a girl feet snaps earns more than 5 lakh per month social media content creator

follow google news

सोशल मीडिया सध्या कमाईचे प्रभावी माध्यम बनत चालला आहे. अनेक तरूण-तरूणी नवनवीन कंटेंट बनवून सोशल मीडियावरून लाखोंची कमाई करत आहेत. कुणी सोशल मीडियावर गमतीशीर व्हिडिओ बनवून कमवत आहे, तर कुणी अत्यावश्यक माहिती देणारे व्हिडिओ बनवून सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई करत आहे. अशाच एका तरूणीची कहानी समोर आली आहे. ही तरूणी तिच्या पायांचे फोटो पोस्ट करून लाखोंची कमाई करते. नेमकी ही तरूणी कशी कमाई करतेय? तिचा हा सोशल मीडियावरचा हा कंटेंट काय आहे? हे जाणून घेऊयात. (a girl feet snaps earns more than 5 lakh per month social media content creator)

हे वाचलं का?

अमेलिया नावाची एक तरूणी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिचे साधारण 5 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. अमेलिया ही एक कॉंटेंट क्रिएटर आहे. सोशल मीडियावर कॉंटेट क्रिएट करून ती कमाई करते. पण ती नेमकी कोणत्या कॉंटेट द्वारे कमाई करते हे जाणून तूम्हाला धक्काच बसेल. अमेलीया या ही तिच्या पायांद्वारे सोशल मीडियावर कमाई करते.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, पायांद्वारे तर चालले जाते, मग कमाई कशी होते. त्याचे उत्तर असे आहे की, अमेलिया ही पायांसंबंधीत कॉंटेट बनवते. तिच्या या कॉंटेटला सोशल मीडियावर खुप पाहिजे जाते. त्यामुळेच ती चर्चेत असते.

हे ही वाचा : Viral: कारमधून विचित्र आवाज यायचा! बोनेट उघडताच कपलला फुटला घाम

अमेलियाने सोशल मीडियावर Funwithfeet नावाचे एक अकाऊंट उघडलं आहे.या अकाऊंटवर अमेलिया तिच्या पायांचे फोटो आणि व्हिडिओ टाकते. या व्हिडिओच्या माध्यमातून अमेलिया पायांची कशाप्रकारे काळजी घेतली जाते, याची महत्वपुर्ण माहिती देते. पायांच्या बोटांची कशी निगा राखायची अशा सगळ्या गोष्टींची अमेलिया माहिती शेअर करते. तिच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खुप पाहिले जाते. त्यामुळे ती अशाप्रकारे अनेक व्हिडिओ बनवत असते. आता या व्हिडिओच्या माध्यमातून चांगली कमाई करते आहे.

अमेलिया सांगते की, सोशल मीडियाच्या माध्यमातून मला हे कळायला वेळ लागला की माझ्या पायांद्वारेही पैसे कमवू शकते. सुरूवातीच्या 6 महिन्यातच मी टीप्स देण्याच्या माध्यमातून हजार रूपये कमावले, असे अमेलिया सांगते. तसेच माझा कंटेट वेगळा आहे, मी फक्त फोटो काढून पोस्ट करत नाही, तर मला माहितीय माझ्या प्रेक्षकांना काय हवे आहे. मी पायांची काळजी कशी घ्यावी यासंबंधित माहिती इंटरनेट देत असते. ज्यामुळे फॉलोवर्स पुन्हा पुन्हा येत असतात, असे अमेलिया म्हणते. तसेच मी महिन्याकाठी 5.21 लाख रूपये कमवत असल्याचे देखील अमेलियाने सांगितले आहे.

    follow whatsapp