Maharashtra Weather Update: मुंबई: मुंबई आणि महाराष्ट्रात पावसाने अद्यापही दमदार हजेरी लावलेली नाही. यंदा सरासरीपेक्षा बराच कमी पाऊस झाला आहे. मागील दोन दिवसात मुंबई आणि उपनगरात रिमझिम पाऊस बरसत आहे. तर कोकणात काही भागात मुसळधार पावसाची सरी येत आहे. मात्र, अद्यापही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. पुढील 24 तासात मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचाच पाऊस येण्याची शक्यता अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे. (accurate forecast of rain in mumbai and maharashtra weather news meteorological department weather forecast for next 24 hours 12th july 2024 mumbai to rain in next 24 hours maharashtra weather forecast)
ADVERTISEMENT
महाराष्ट्र हवामान अपडेट (Maharashtra Weather Alert)
मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हवामानाचे अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहेत. जाणून घ्या सविस्तरपणे.
मुंबई आणि उपनगरात रिमझिम पावसाची शक्यता
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज असा की, शहर आणि उपनगरात मध्यम ते मसुळधार पाऊस होईल. काही ठिकाणी अति मसुळधार पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 28°C आणि 24°C च्या आसपास असेल.
हे ही वाचा>> Raigad Fort: रायगडावर असं का घडलं?, ही दृश्य पाहून तुम्हीही हादरून जाल!
कोकणात कसं असेल हवामान
उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात पावसाने दिली ओढ, तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस
मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT