Anuja Salvi Cry Acb Inquiry : ठाकरे गटाचे कोकणातील आमदार राजन साळवी (rajan salvi) तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. आमदार साळवींसह त्यांच्या कुटुंबियांची देखील चौकशी सूरू आहे. राजन साळवी यांच्या पत्नी अनुजा साळवी यांची देखील चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर एसीबी (Acb Inquiry) कार्यालयात ठेवलेल्या आरोपींच्या रजिस्टरवर त्यांना सही करण्यास सांगितलं होतं. त्यामुळे एसीबी कार्यालयात सही करण्यास सांगितल्याने अनुजा साळवी यांना खूप वाईट वाटलं होतं. त्यामुळे माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना त्या ढसाढसा रडल्या होत्या. (anuja salvi cry after 4 hours acb inquiry rajan salvi thackeray group mla)
ADVERTISEMENT
अनुजा साळवी माध्यमांना चौकशीची माहिती देताना म्हणाल्या की, चौकशीत आज मला व्यवसायाबाबत माहिती विचारण्यात आली होती. याबाबतची सगळी माहिती मी चौकशी अधिकाऱ्यांना दिली होती. पण आज या गोष्टीचे मला वाईट वाटलं की, आम्हाला आरोपीच्या रजिस्टरवर सही करायला लावली,असे म्हणत अनुजा यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.
हे ही वाचा : मोबाईलची बॅटरी कानाला लावली अन्..., क्षणात चिमुकल्याचा जीवच गेला
आम्ही इथे चौकशीसाठी हजर राहतो. पण त्यांनी 1 ते 5 या वेळेत बसायचंच आहे. जरी तुमची चौकशी होत असली किंवा होत नसली तरी तुम्हाला बसावच लागेल, असे अनुजा साळवी यांनी सांगितले. आज माझी चौकशी पुर्ण झाली. कागदपत्रही पुरवली.पण मी 8 तारखेपर्यंत येणार आहे, असे अनुजा साळवी यांनी सांगितले.
एसीबीने आज माझ्या पत्नी आणि मुलाला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार सकाळपासून त्यांनी आमची चौकशी केली. या चौकशीत अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी उत्तर आम्ही दिली. आवश्यक ती कागदपत्रेही दिली. उद्या पुन्हा चौकशीला हजेरी लावायची आहे. आज माझ्या पत्नीच्या व्यवसायासंबंधीची, उत्पनासंबंधीची माहिती विचारण्यात आली. या संबंधित कागदपत्रेही दिली. आज तीची संपूर्ण चौकशी पुर्ण झालेली आहे. आता मुलगा शुभमची चौकशी होईल, असे आमदार राजन साळवी यांनी माध्यमांना सांगितले.
ADVERTISEMENT