Rape Crime : उत्तर प्रदेशच्या कासगंज जिल्ह्यातून सर्वांनाच हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एक महिला तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत या जिल्ह्यातील हजारा नहर येथील नदरई एक्वाडक्ट पिकनिक पॉईंटला फिरायला आली होती. यावेळी 8 नराधमांनी महिलेला एका रुममध्ये जबरदस्ती खेचून नेलं आणि तिचा गँगरेप केला. इतकच नाही तर त्या पीडितेच्या होणाऱ्या नवऱ्यालाही रुमबाहेर मारहाण केली.
ADVERTISEMENT
याप्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली आहे. इतर तीन आरोपी अजूनही फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तरुणीला जबरदस्ती खेचून रुममध्ये नेलं. रुमच्या बाहेर तिच्या प्रियकराला मारहाण करून धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी पीडित तरुणीवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
हे ही वाचा >> भाचा मामीच्या प्रेमात आकंठ बुडाला! आकाशचा कांड उघडकीस आला अन् जे घडलं...सर्वांनाच हादरा बसला
काय आहे संपूर्ण प्रकरण?
साखरपूड्यानंतर एक तरुणी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरायला गेली. परंतु, तिचा आनंदाचा क्षण काही जणांच्या विकृतीमुळे नष्ट झाला. जेव्हा आठ तरुण त्या ठिकाणी पोहोचले आणि या दोघांसमोर अश्लील हावभाव करू लागले.त्यानंतर आरोपींनी त्या तरुणाला बांधून ठेवलं. त्याला मारहाण केली आणि त्याच्याकडे असलेला ऐवजही लंपास केला. तर तरुणीला एका रुममध्ये नेऊन आळीपाळीने गँगरेप केला. घाबरलेली पीडिता दोन दिवस शांत राहिली. पण तिची तब्येत बिघडल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार तिने तिच्या कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली.
हे ही वाचा >> अत्याचार प्रकरणातला आरोपी विशाल गवळीने स्वत:ला कसं संपवलं? कशी होती 'चीड आणणारी' क्राईम हिस्ट्री?
आरोपींच्या फोनमध्ये मिळाला तो व्हिडीओ
पोलिसांनी कारवाई करत आठ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि पाच आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये पोलिसांना अश्लील व्हिडीओ मिळाले. दरम्यान, पीडितेची मेडिकल चाचणी करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात कडक कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT
