भाचा मामीच्या प्रेमात आकंठ बुडाला! आकाशचा कांड उघडकीस आला अन् जे घडलं...सर्वांनाच हादरा बसला

Murder Case Latest Update : उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने मामीच्या प्रेमात पडून सर्वात भयंकर कृत्य केलं.

Uttar Pradesh Viral Love Story (फोटो- AI)

Uttar Pradesh Viral Love Story (फोटो- AI)

मुंबई तक

• 03:26 PM • 13 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मामीच्या प्रेमात पडलेल्या भाच्याने नेमकं केलं तरी काय?

point

आकाश, विजय आणि रोहितने केला मोठा कांड आणि...

point

पोलिसांनाही बसला मोठा धक्का

Murder Case Latest Update : उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने मामीच्या प्रेमात पडून सर्वात भयंकर कृत्य केलं. त्याने आपल्याच मामाची  निर्घृण हत्या केली. तरुणाला या संतापजनक कृत्यात त्याचा चुलत भाऊ आणि मित्रांनीही त्याला मदत केली. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. ही खळबळजनक घटना कौशांबी जिल्ह्यातील संदीपन घाट परिसरात असलेल्या सिकंदरपूर गावात घडली. 

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी गावाजवळ असलेल्या एका झाडाखाली एका तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह सापडला. यामुळे स्थानिक लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटस्थळी धाव घेतली. महेंद्र प्रजापती (28) असं मृताचं नाव आहे. पोलिसांना मृतदेहाजवळ एका पिकअप वाहनाचा नंबर मिळाला. यामुळे मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी मृताच्या मोबाईलची कॉल डिटेल्स काढून लोकेशन ट्रेस केलं. या तपासात तीन संशयितांची नावं समोर आली.

हे ही वाचा >>"100 किलोचा माणूस टॉवेलने कसा फास घेऊ शकतो" आरोपी विशाल गवळीच्या कुटुंबाला घटनेवर संशय

आकाश, विजय आणि रोहितने केला मोठा कांड आणि...

आकाश, रोहित आणि विजय अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
तपासात अशी माहिती समोर आली की, यामुळे पोलिसांनी धक्काच बसला. मुख्य आरोपी आकाशने सांगितलं की,  मृतक महेंद्र त्याचा सख्खा मामा होता आणि त्याचे (आकाश) मामीसोबत प्रेमसंबंध होते. याआधीही तो त्याच्या मामीला घेऊन दोन वेळा पळाला होता, असंही आकाशने सांगितलं.

हे ही वाचा >> अत्याचार प्रकरणातला आरोपी विशाल गवळीने स्वत:ला कसं संपवलं? कशी होती 'चीड आणणारी' क्राईम हिस्ट्री?

त्यामुळे कुटुंबात वादविवाद झाला होता. त्यानंतर कुटुंबियांनी आकाशला अपमानित केलं आणि त्याने बदला घेण्याचं ठरवलं. गुरुवारी रात्री आकाशने त्याचा चुलत भाऊ रोहित आणि मित्र विजयशी संगनमत करून मामाचा काटा काढण्याचं ठरवलं. तिघांनी महेंद्रला सुनसान जागेवर बोलावलं आणि तिथे डोक्यावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिला. 

 

    follow whatsapp