भिवंडी : पुनर्जन्मावर काही जण विश्वास ठेवतात, तर अनेक जण याला वैज्ञानिक आधार नसल्याचं म्हणतात. मात्र ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत एका व्यक्तीला शब्दशः पुरर्जन्म मिळाला आहे, असचं म्हणावं लागेल. इमारत पडून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीला तब्बल 20 तासानंतर एनडीआरफच्या जवानांनी जिवंत बाहेर काढलं आहे. विशेष म्हणजे आज या व्यक्तीचा वाढदिवस होता. सुनिल असं या तरुणाचं नाव आहे. (Bhiwandi building disaster, Youth buried under rubble for 20 hours emerges safely)
ADVERTISEMENT
याबाबत अधिक माहिती अशी की, भिवंडी येथे काल (शनिवारी) ‘वर्धमान’ नावाची इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात ढिगाऱ्याखाली जवळपास अनेक जण अडकल्याचा संशय होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिवासी आणि गोडावून असे एकत्रितपणे या इमारतीचे बांधकाम होते. यातील तळमजल्यावरील भागात गोडावून होते, तर वरील 2 मजले रहिवासी होते. इथे 8 ते 10 कुटुंब वास्तव्यास होते. तळमजल्यातील गोडावूनमध्ये काही कामगार काम करत होते.
हे ही वाचा : ‘महाराष्ट्र दिनापासून…’ मुख्यमंत्री शिंदेंनी केली प्रचंड मोठी घोषणा
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरफ आणि फायर ब्रिगेडच्या जवानांनी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली होती. रात्र आणि दुसरा दिवस उजाडेपर्यंत 14 जणांना बाहेर काढण्यात आले. यापैकी 10 जणांना सुखरुप बाहेर काढले तर 4 जणांचा मृत्यू झाला. अशातच एनडीआरएफच्या जवानांनी आज सुनिल यांना ढिगाऱ्याखालू बाहेर काढलं. बाहेर येताच सुनिल ढसाढसा रडायला लागला. त्यांच्या डोळ्यात जिवंत बाहेर आल्याने आनंदाश्रू होते.
यानंतर बोलताना सुनिल यांनीही आज माझा वाढदिवस आहे आणि माझा नवीन जन्म झाला असल्याचं म्हटलं. ते म्हणाले, माझ्यासोबत अपेक्षा नव्हती असचं घडलं आहे. ज्यांनी माझा जीव वाचवला त्या सर्व एनडीआरएफ आणि मित्रांना धन्यवाद देतो. मी माझ्या जगण्याच्या अपेक्षा सोडून दिलेल्या होत्या. पण मला सर्वांचे आशीर्वाद होते, मित्र रात्रभर माझ्यासाठी तिथं होते. त्यामुळे मी जिवंत बाहेर येऊ शकलो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हे ही वाचा : आप्पासाहेबांच्या घराण्याला ‘धर्माधिकारी’ आडनाव नेमकं कोणी दिलेलं… ‘शांडिल्य’ आडनाव कसं बदललं?
मुख्यमंत्री शिंदेंची घटनास्थळी भेट :
दरम्यान, अपघातानंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला, अपघातानंतर मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत त्यांनी जाहीर केली. तसंच जखमींवर सर्व उपचार करण्याचे आदेश त्यांनी दिले. यावेळी पावसापूर्वी अशा मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले.
ADVERTISEMENT