Crime : खळबळजनक! मुंबईहून जाणाऱ्या 'या' विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

14 Oct 2024 (अपडेटेड: 14 Oct 2024, 12:56 PM)

Bombing Threat Latest News : मुंबईत विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या दोन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीमुळं मोठी खळबळ उडाली आहे. याआधी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.

Bombing Threat To Mumbai Airport

Bombing Threat To Mumbai Airport

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंडिगो एअरलाईन्सच्या दोन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी

point

मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

point

विमानांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीमुळं खळबळ

Bombing Threat Latest News : मुंबईत विमानतळावर इंडिगो एअरलाईन्सच्या दोन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीमुळं मोठी खळबळ उडाली आहे. याआधी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे दिल्लीत विमानांची एमरजन्सी लँडिंग करण्यात आली. इंडिगो फ्लाईट 6E 1275, मुंबईहून मस्कटला रवाना होणार होती. तर इंडिगो फ्लाईट 6E 56, मुंबईहून जेद्दाला उड्डाण केली होती. दोन्ही विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा अलर्ट जारी केलं आहे. 

हे वाचलं का?

इंडिगो प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली, त्यानंतर सुरक्षा प्रोटोकॉलनुसार या विमानांना विमानतळावरून एका वेगळ्या परिसरात नेण्यात आलं. ज्यामुळे प्रवासी आणि विमानतळावरील सुरक्षा निश्चित करायची होती. एसओपीच्या माध्यमातून या प्रकरणी तपास सुरु केला आहे. या प्रक्रियेत विमानतळावरील सुरक्षा टीम, बॉम्ब शोधक पथक आणि अन्य एजन्सी सामील होत्या. विमानांची कसून तपासणी केली जात आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारचा संभाव्य धोका टाळता येईल. 

हे ही वाचा >>  Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट कुणी रचला? लॉरेन बिश्नोईने 9 दिवसांचा उपवास केला अन्..

विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षीत ठिकाणी नेण्यात आलं. प्रवाशांची सुरक्षा त्यांची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रवाशांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. एअरलाईन्स आणि विमानतळावरील स्टाफकडून प्रवाशांना योग्य माहिती दिली जात आहे. बॉम्बची धमकी आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. धमकी कुणी दिली आणि कोणत्या ठिकाणाहून दिली, याचा तपास सुरु आहे.

याआधी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली होती. त्यामुळे विमानाला दिल्लीच्या दिशेनं फिरवण्यात आलं होतं. दिल्लीच्या IGI विमानतळावर लँडिंग करण्यात आली होती. प्रवासी आणि क्रू मेम्बर्सच्या सुरक्षेचा विचार करून सेक्युरिटी प्रोटोकॉलच्या माध्यमातून विमानाची तपासणी करण्यात आलीय.

    follow whatsapp