Ramgiri Maharaj News : इसरार चिश्ती, छ. संभाजीनगर : महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले होते. त्यामुळे नागरीकांकडून आणखीण रोष व्यक्त होतं आहे. त्यामुळे नेमकं महंत रामगिरी महाराज यांनी काय वादग्रस्त वक्तव्य केलं होतं? आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात. (case register against mahant ramgiri maharaj Seating with cm eknath shinde what was the case sambhaji nagar protest)
ADVERTISEMENT
महंत रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. या वक्यव्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यात लोक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी या आंदोलकांनी रामगिरी महाराज यांच्या अटकेची मागणी केली होती.तसेच काही ठिकाणी दगडफेकीच्या घटनाही घडल्या आहेत.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 96 लाख महिलांच्या खात्यात 3000 जमा, तुमच्या बँकेत कधी पोहोचणार?
रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथे एका समुदायाकडून शहरातील सिटी चौक पोलीस ठाणे येथे रामगिरी महाराज यांच्यावरती गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी एक समुदाय मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात समोर जमा झाला होता. त्यानंतर पोलिसांकडून रीतसर कारवाई करतो असे देखील शिष्टमंडळ यांना सांगण्यात आलं होतं. पण त्यानंतर पोलिसांनी ठाण्यासमोर थांबू नका इथून जा असं विनंती करत जमावाला सावरासावर करायला सुरुवात केली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया
दरम्यान रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ''बांगलादेशात जो प्रकार घडला, आज कोट्यवधी हिंदूंवर अत्याचार सुरु आहे. आमच्याकडे एक बातमी तर अशी आली की, बांगलादेशात एका महिलेवर तब्बल 30 जणांनी बलात्कार केला. कोटी-दीड कोटी लोक भारताच्या सीमेवर उभे आहेत की, आम्हाला भारतात आश्रय द्या. त्यामुळे आम्ही प्रतिक्रिया देताना सांगितलं की, हिंदूंनी सुद्धा मजबूत राहायला हवं. बांगलादेशात जे घडलं ते उद्या आपल्या इथे घडायला नको. अन्याय करणारा जसा अपराधी असतो तसा सहन करणारा देखील अपराधी असतो. त्यामुळे आपण अन्यायाला प्रतिकार केला पाहिजे'', असं महंत रामगिरी महाराज म्हणाले.
आपला धर्म आणि संस्कृती शांततेच्या मार्गाने चालले आहेत. पण कुणी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला तर आपण सुद्धा प्रत्युत्तर देण्याची तयारी ठेवावी. या दृष्टीकोनातून आम्ही जे काही बोललो ते बोललो आहेत, असे रामगिरी महाराजांनी स्पष्ट केले होते.
हे ही वाचा : Sharad Pawar: "महाराष्ट्राचं चित्र बदलायचं असेल, तर..."; मविआच्या मेळाव्यात शरद पवारांचं सूचक विधान
पोलिसांचे नागरीकांना आवाहन
दरम्यान पोलिसांनी नागरीकांना आवाहन देखील केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आज सरला बेट येथील महंत रामगिरी महाराज यांचा मोहम्मद पैगंबरांविषयी बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तरी सदरचा व्हिडिओ हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नसून इतर ठिकाणाचा आहे, तरी त्या बाबत मुस्लिम समाजाकडून प्राप्त निवेदनावरून पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत.
सदरचा व्हिडिओ कोणी समाजमाध्यमांवर प्रसारित करू नये तसेच त्याबाबत अफवा पसरू नये ज्यांच्याकडे हा व्हिडिओ आहे त्यांनी तो तात्काळ डिलिट करावा. सदर व्हिडिओ जो प्रसारित करेल त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तरी नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरू नये अफवांवर विश्वास ठेऊ नये असे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.
ADVERTISEMENT