Chandrayaan-3 Landing update : चांद्रयान-3 आज म्हणजेच 23 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 5.30 ते 6.30 च्या दरम्यान चंद्रावर पाऊल ठेवेल. लँडिंग दक्षिण ध्रुवाजवळ असेल. इस्रोने दिलेल्या माहितीनुसार रेखांश आणि अक्षांश हे मेनिन्जेस विवराकडे संकेत देतात म्हणूनच कदाचित लँडिंग त्या आसपास आहे. यापूर्वी चांद्रयान-3 ताशी 40 हजार किलोमीटर वेगाने अंतराळात धावत होते. आता ते कासवाच्या वेगापेक्षा कमी वेगाने लँडिंग करेल. (chandrayaan-3 latest news in Marathi : Chandrayaan-3 will move like a turtle for successful landing on the moon)
ADVERTISEMENT
कासव सरासरी 4 ते 5 मीटर प्रति सेकंद या वेगाने पोहतो. 1 ते 2 मीटर प्रति सेकंद या वेगाने जमिनीवर चालतो. कासवांची नवीन पिल्ले 40 किलोमीटरचा प्रवास 30 तासांत पूर्ण करतात. मादी कासव त्यांच्या मुलांपेक्षा किंवा नर कासवांपेक्षा वेगाने पोहतात किंवा धावतात. जेणेकरून ते आपल्या मुलांना भक्षकांपासून वाचवू शकतील. चांद्रयान-3 चे लँडिंग 1 ते 2 मीटर प्रति सेकंद या वेगाने होईल.
दुसरीकडे, रशियाचे लुना-25 अंतराळ यान पटकन पोहोचण्याच्या नादात तांत्रिक बिघाड होऊन दक्षिण ध्रुवावर कोसळले. रशियन स्पेस एजन्सीचे प्रमुख म्हणतात की Luna-25 निश्चित वेगापेक्षा दीड पट जास्त वेगाने पुढे गेले. निश्चित कक्षेच्या तुलनेत ओव्हरशूट झालं आणि चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले. आता इस्रोचे चांद्रयान-3 आपला 42 दिवसांचा प्रवास संथ गतीने करत होते. गुरुत्वाकर्षणाचा फायदा घेत होते.
चांद्रयान-3 चा वेग कसा आहे कासवासारखा… आता जाणून घ्या
– विक्रम लँडर 25 किमी उंचीवरून चंद्रावर उतरण्याचा प्रवास सुरू करेल. पुढील टप्प्यावर पोहोचण्यासाठी सुमारे 11.5 मिनिटे लागतील. म्हणजेच 7.4 किलोमीटर उंचीपर्यंत.
– 7.4 किलोमीटर उंचीपर्यंत त्याचा वेग 358 मीटर प्रति सेकंद असेल. पुढील टप्पा 6.8 किलोमीटरचा असेल.
– 6.8 किमी उंचीवर, वेग 336 मीटर प्रति सेकंद कमी होईल. पुढील स्तर 800 मीटर असेल.
– 800 मीटर उंचीवर लँडरचे सेन्सर्स चंद्राच्या पृष्ठभागावर लेझर किरण टाकून लँडिंगसाठी योग्य जागा शोधतील.
– 150 मीटर उंचीवर लँडरचा वेग 60 मीटर प्रति सेकंद असेल. म्हणजे 800 ते 150 मीटर उंचीच्या दरम्यान.
– 60 मीटर उंचीवर लँडरचा वेग 40 मीटर प्रति सेकंद असेल. म्हणजे 150 ते 60 मीटर उंचीच्या दरम्यान.
– 10 मीटर उंचीवर लँडरचा वेग 10 मीटर प्रति सेकंद असेल.
– चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना म्हणजेच सॉफ्ट लँडिंगसाठी लँडरचा वेग 1.68 मीटर प्रति सेकंद असेल.
चांद्रयान-3 आता कुठे आहे, कोण हाताळणार?
चांद्रयान-3 चे विक्रम लँडर 25 किमी x 134 किमीच्या कक्षेत फिरत आहे. या 25 किमी उंचीवरून चंद्राच्या पृष्ठभागापर्यंत खाली जावे लागते. मागच्या वेळी चांद्रयान-2 चा वेग, सॉफ्टवेअरमधील बिघाड आणि इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे पडले होते. यावेळी ती चूक होऊ नये यासाठी चांद्रयान-3 मध्ये अनेक प्रकारचे सेन्सर आणि कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
Chandrayaan-3 Moon Landing Live Update: भारत इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, चांद्रयान 3 चं लँडिंग ‘इथे’ पाहा LIVE
विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे कसे उतरवायचे, यासाठीच LHDAC कॅमेरा बनवण्यात आला आहे. यासह हे पेलोड्स लँडिंगच्या वेळी मदत करतील, ते आहेत- लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेरा (LPDC), लेझर अल्टिमीटर (LASA), लेझर डॉप्लर व्हेलॉसिटीमीटर (LDV) आणि लँडर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कॅमेरा (LHVC) हे एकत्र काम करतील. जेणेकरून लँडर सुरक्षित पृष्ठभागावर उतरवता येईल.
संरक्षणासाठी अशी आहे व्यवस्था
यावेळी विक्रम लँडरमध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. पहिली म्हणजे यात सेफ्टी मोड सिस्टम आहे. जे कोणत्याही प्रकारच्या अपघातापासून वाचवेल. यासाठी विक्रममध्ये दोन ऑनबोर्ड कॉम्प्युटर बसवण्यात आले असून, ते सर्व प्रकारच्या धोक्याची माहिती देणार आहेत. ही माहिती त्यांना विक्रमवरील कॅमेरे आणि सेन्सरद्वारे दिली जाणार आहे.
वाचा >> Chandrayaan3 चंद्राच्या उंबरठ्यावर! विक्रम लँडर-प्रोपल्शन मॉड्यूल कसं करणार काम?
चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचे रशियाचे 47 वर्षांचे स्वप्न भंगले. काही दिवसांपूर्वी इस्रोचे माजी शास्त्रज्ञ विनोद कुमार श्रीवास्तव यांनी Aaj Tak शी बोलताना सांगितले की, इतिहासात बघितलं तर चंद्रावर जी काही मोहीम थेट पाठवली गेली आहे. त्यात तीनपैकी एक मोहीम अयशस्वी झाली आहे. चांद्रयान-3 ने घेतलेल्या मार्गावर अपयश येण्याची शक्यता कमी आहे.
वाचा >> Chandrayaan 3 : जे कुणाला जमलं नाही ते भारताने केलं, चंद्राचे ‘ते’ दुर्मिळ फोटो ISRO ने केले ट्वीट!
Luna-25 च्या क्रॅशनंतर रशियन स्पेस एजन्सीने म्हटले होते की Luna-25 मूळ पॅरामीटर्सपासून विचलित झाले आहे. निश्चित कक्षेऐवजी ते दुसर्या कक्षेत गेले, जिथे त्याने जायला नको होते. त्यामुळे ते थेट चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ कोसळले.
चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे कठीण का आहे?
जगभरातील शास्त्रज्ञांना माहित आहे की चंद्राच्या पृष्ठभागावर त्याच्या कक्षेतून उतरणे सोपे नाही. पहिले अंतर. दुसरे वातावरण. तिसरे गुरुत्वाकर्षण. चौथं उभे लँडिंग करताना इंजिनचा दाब योग्य प्रमाणात तयार करणे. म्हणजे थ्रस्टर्स व्यवस्थित चालू असावेत. नेव्हिगेशन योग्य मिळणे. उतरण्याची जागा सपाट असावी. या समस्यांशिवाय आणखी अनेक समस्या असतील ज्या फक्त शास्त्रज्ञांनाच माहीत असतील.
चंद्रावर किती वेळा यशस्वी लँडिंग झाले आहे?
गेल्या सात दशकांत आतापर्यंत 111 मोहिमा चंद्रावर झाल्या आहेत. त्यापैकी 66 यशस्वी झाल्या, तर 41 अयशस्वी. 8 मध्ये काही प्रमाणात यश मिळाले. इस्रोचे माजी प्रमुख जी. माधवन नायर यांनीही चंद्र मोहीम यशस्वी होण्याची 50 टक्के शक्यता असल्याचे म्हटले आहे. 1958 ते 2023 पर्यंत भारत, अमेरिका, रशिया, जपान, युरोपियन युनियन, चीन आणि इस्रायलने चंद्रावर अनेक मोहिमा झाल्या आहेत. यामध्ये इम्पॅक्टर, ऑर्बिटर, लँडर-रोव्हर आणि फ्लायबाय यांचा समावेश आहे.
वाचा >> CM शिंदेंना ठाण्यावरून घेरलं, आता मंत्र्यालाही झापलं! महायुतीत अजित पवारच ‘दादा’?
2000 ते 2009 पर्यंत सांगायचं झालं तर या 9 वर्षात सहा चंद्र मोहिमा पाठवण्यात आल्या. युरोपचे स्मार्ट-1, जपानचे सेलेन, चीनचे चांगाई-1, भारताचे चांद्रयान-1 आणि अमेरिकेचे लूनर रिकॉनिसन्स ऑर्बिटर. 1990 पासून अमेरिका, जपान, भारत, युरोपियन युनियन, चीन आणि इस्रायल यांनी एकूण 21 चंद्र मोहिमा पाठवल्या आहेत.
लुना-25 असे पोहोचले होते चंद्राच्या कक्षेत
रशियाने सोयुझ रॉकेटमधून प्रक्षेपण केले होते. लुना-25 लँडर पृथ्वीच्या बाहेर गोलाकार कक्षेत सोडण्यात आले. त्यानंतर हे यान थेट चंद्राच्या महामार्गावर गेलं. त्या महामार्गावर त्याने 5 दिवस प्रवास केला. यानंतर ते चंद्राभोवतीच्या कक्षेत पोहोचले. पण नियोजित लँडिंगच्या एक दिवस आधी क्रॅश झाले.
लँडिंगबाबत असा होता प्लान
रशियाची योजना अशी होती की 21 किंवा 22 ऑगस्टला लुना-25 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. त्याचे लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर 18 किमीवर गेल्यानंतर लँडिंगला सुरुवात करेल. 15 किमीपर्यंत उंची कमी केल्यानंतर 3 किमीच्या उंचीवरून पॅसिव्ह डिसेंट म्हणजेच हळूहळू लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. 700 मीटर उंचीवरून, त्याचा वेग कमी करण्यासाठी थ्रस्टर्स वेगाने चालू असतील. 20 मीटर उंचीवर, इंजिन मंद गतीने चालेल. जेणेकरून ते उतरू शकेल.
ADVERTISEMENT