Pandharpur : विठुरायाच्या दारातले पंखे फक्त मंत्र्यांसाठी? महिलेनं मुश्रीफांना जाब विचारला

Pandharpur News: जळगावमधून पंढरपुरात दर्शनासाठी आलेल्या एका महिला भक्ताची लहान मुलगी खेळताना पडली. ती मुलगी पडल्यानंतर आपल्या रडणाऱ्या मुलीला घेऊन पंख्याखाली थांबली. तेव्हा, पोलिसांनी त्या महिलेला बाजूला सरकायला सांगितल्यावर हा वाद झाला.

Mumbai Tak

मुंबई तक

17 Mar 2025 (अपडेटेड: 17 Mar 2025, 03:08 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या दारात गोंधळ

point

मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारला जाब

point

फॅन फक्त मंत्र्यांसाठी आहे का? महिलेचा सवाल

Pandharpur : विठ्ठल मंदिरातील पंखा फक्त मंत्र्यांसाठी आहे का ? असा बेधडक सवाल करत मंत्र्‍यांना जाव विचारणाऱ्या महिला भाविकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये एक महिला गर्दीमध्ये थेट हसन मुश्रीफ यांना सवाल करताना दिसते आणि मंत्री मुश्रीफ दोन शब्द बोलून नंतर दिलगिरी व्यक्त करताना दिसले. तर ज्या पोलिसांमुळे मुश्रीफांना ऐकावं लागलं, ते पोलीस काढता पाय घेताना दिसले. हा संपूर्ण प्रकार नेमका काय ते समजून घेऊ.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Latur: 'हा' हायवे नाही तर मृत्यूचं द्वार आहे, तीन प्रचंड मोठे अपघात अन्...

कुटुंबानं का संपात व्यक्त केला? 

जळगावमधून पंढरपुरात दर्शनासाठी आलेल्या एका महिला भक्ताची लहान मुलगी खेळताना पडली. ती मुलगी पडल्यानंतर आपल्या रडणाऱ्या मुलीला घेऊन पंख्याखाली थांबली. यावेळी तिथे असलेल्या पोलिसांनी महिला बाजूला सरकायला सांगितलं. मंत्री येतायत, बाजूला सरका असं पोलिसांनी महिलेला सांगितल्यावर महिला संतापली. महिलेनं थेट तिथे आलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनाच जाब विचारला. 

रोहन पाटील हा तरूण म्हणाला, "माझी भाची गर्दीत धक्का लागून पडली. तिला डोक्याला लागलं. त्यावेळी आम्ही तिला घेऊन पंख्याखाली उभे राहिलो. त्यावेळी पोलिसांनी हटवलं आणि सांगितलं मंत्री येतायत, तुम्ही बाहेर जा. मग हे पंखे मंत्र्‍यांसाठी लावलेत का?" असा सवाल या तरूणानं केला.

महिला काय म्हणाली? 

हे ही वाचा >> Maharashtra Weather : विदर्भाला पुन्हा बसणार उन्हाचा तडाखा! मुंबईसह 'या' ठिकाणी कसं असेल आजचं तापमान?

"आम्ही जळगावमधून आलो, इथे आमची मुलगी खेळता खेळता पडली. मुलगी पडल्यावर आम्ही फॅनखाली थांबलो. तेव्हा पोलीस म्हणाले साहेब आलेत, बाहेर चला. मग आम्ही मंत्र्‍यांकडे तक्रार केली. तेव्हा मंत्री म्हणतात, दिलगिरी व्यक्त करतो पोलिसांशी बोला. पोलीस म्हणतात, मुलगी आम्ही पाडली का?" यावरु महिला चांगलीच संतप्त झालेली दिसली. त्यानंतर ह्या महिलेनं माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर संताप व्यक्त केला. "ह्यांना आम्हीच मंत्री केलं ना, यांना आम्हीच मत देतो" असं महिला म्हणाली. दरम्यान, जळगावच्या या संतप्त भाविकांनी पोलिसांबद्दल तीव्र नाराज व्यक्त केली.


 

    follow whatsapp