Vijay Darda आणि त्यांचा पुत्र कोळसा घोटाळा प्रकरणी दोषी, ‘या’ दिवशी ठरणार शिक्षा

मुंबई तक

14 Jul 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 04:05 AM)

कोळसा घोटाळा प्रकरणी माजी खासदार विजय दर्डा यांना कोर्टाने मोठा झटका दिला आहे. छत्तीसगडमधील कोळसा खाणी वाटपातील अनियमिततेशी संबंधित एका प्रकरणात कोर्टाने त्यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवलं आहे.

court has given a big blow to former MP Vijay Darda in Kolsa scam case. In a case related to irregularities in distribution of Kolsa Khani in Chhattisgarh, the court has convicted six people along with him.

court has given a big blow to former MP Vijay Darda in Kolsa scam case. In a case related to irregularities in distribution of Kolsa Khani in Chhattisgarh, the court has convicted six people along with him.

follow google news

नवी दिल्ली : कोळसा घोटाळा (Coal Scam) प्रकरणी काँग्रेसचे माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा (Vijay Darda) यांना मोठा झटका बसला आहे. छत्तीसगडमधील कोळसा खाणी वाटपातील अनियमिततेशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली न्यायालयाने गुरुवारी सहा जणांना दोषी (convicted) ठरवले. यामध्ये माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि माजी कोळसा सचिव एचसी गुप्ता यांचा समावेश आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींना दोषी ठरवले आहे. (former congress mp vijay darda including six convicted in coal block allocation case)

हे वाचलं का?

कोर्टाने कोणा-कोणाला ठरवलं दोषी?

विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी कोळसा घोटाळ्यात दर्डा यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, (Devendra Darda) केएस क्रोफा आणि केसी समरिया, मेसर्स जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही दोषी ठरवले आहे. न्यायालयाने त्यांना आयपीसी कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचाराशी संबंधित कलमांखाली दोषी ठरवले आहे.

न्यायालयाने आरोपींना गुन्हेगारी कट रचणे (IPC कलम 120-B अंतर्गत शिक्षापात्र) आणि फसवणूक (IPC कलम 420 अंतर्गत शिक्षापात्र) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांसाठी दोषी ठरवलं आहे. या प्रकरणातील शिक्षेवर 18 जुलै रोजी कोर्टात सुनावणी होणार आहे.

हे ही वाचा >> ‘अमित शाह म्हणालेले, अपमान सहन करा पण…’, मातोश्रीतील ‘त्या’ बैठकीवर फडणवीसांचे गौप्यस्फोट

तत्कालीन राज्यसभा सदस्य दर्डा यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना लिहिलेल्या पत्रांमध्ये तथ्य चुकीचे मांडल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. डॉ.मनमोहन सिंग यांच्याकडे त्यावेळी कोळसा मंत्रालयाचा कारभार होता.

10 नोव्हेंबर 2016 रोजी येथील विशेष न्यायालयाने विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक जयस्वाल, माजी कोळसा सचिव गुप्ता, केसी समरिया आणि केएस क्रोफा यांच्यावर या सगळ्यांविरोधात विविध कलमांखाली आरोप निश्चित केले होते. जे आता सिद्ध झाले असून या सगळ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. त्यामुळे विजय दर्डा आणि त्याचा मुलगा देवेंद्र दर्डा यांना मोठा झटका बसला आहे. आता या प्रकरणी कोर्ट नेमकी काय शिक्षा सुनावतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा >> BJP: अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय चुकला?, ‘हा’ सर्व्हे भाजपसाठी धोक्याची घंटा

दरम्यान, विशेष कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर हायकोर्टात जाण्याचा पर्याय दर्डा आणि इतर दोषींकडे असणार आहे. पण या सगळ्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

    follow whatsapp