कामाची बातमी: आधार कार्डमधील कोणते बदल ऑनलाईन आणि कोणते Aadhar सेंटरमध्ये?

अनेकांना सरकारी किंवा खाजगी कामकाजासाठी अधार अपडेट करण्याची गरज भासते. मात्र, याबाबतीत पुरेशी माहिती न मिळाल्याने त्यांचा गोंधळ होतो. आम्ही तुम्हाला आधार कार्डमधील कोणते बदल ऑनलाइन करायचे आणि कोणते ऑफलाइन याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.

आधार कार्डबाबत महत्त्वाची माहिती

आधार कार्डबाबत महत्त्वाची माहिती

मुंबई तक

• 10:00 AM • 13 Apr 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आधार अपडेट कसं करायचं?

point

आधार अपडेट करताना कोणते बदल घरबसल्या करता येतात?

point

कोणते बदल करण्यासाठी आधार सेंटरला जावे लागते?

Aadhar Update: राम आणि श्याम हे लहानपणीपासूनचे मित्र. दोघांच्याही अडचणीसुद्धा सारख्याच बरं! नुकतंच दोघांनाही त्यांच्या आधार कार्डमध्ये काही बदल करण्याची गरज भासली. आधार कार्ड अपडेटसाठी त्यांनी बरीच विचारपूस आणि चौकशी केली. मात्र, आधार कार्डमधील कोणते बदल हे ऑनलाईन होतात आणि कोणत्या बदलांसाठी आधार सेंटरला जावं लागतं, याबाबतीत त्यांना काही कळत नव्हतं. 

हे वाचलं का?

खरंतर, रामला त्याच्या आधार कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अपडेट करायचा होता. तसेच, श्यामला त्याच्या आधार कार्डमध्ये त्याचा फोटो आणि बायोमेट्रिक अपडेट करायचा होता. ते दोघे UIDAI च्या वेबसाईटवर गेले आणि त्यांच्यासमोर बरेच पर्याय आले. मात्र, अजूनही कोणते अपडेट घरबसल्या ऑनलाईन करता येतील आणि कोणते बदल करण्यासाठी आधार सेंटरला जावं लागेल? हे त्यांना स्पष्ट होत नव्हतं. 

चला, राम आणि श्यामचा हा गोंधळ कसा दूर होईल, याबाबतीत सविस्तर जाणून घेऊया.

रामला त्याचा मोबाईल नंबर आणि पत्ता अपडेट करायचा होता. 

कोणते बदल घरबसल्या ऑनलाईन करता येतात?

1. नाव (नावातील स्पेलिंग सुधारता येतात)
2. जन्मतारीख (एकदाच सुधारता येते)
3. लिंग (Male/Female/Transgender)
4. पत्ता (वैध पत्ता असलेला पुरावा असणे आवश्यक)
5. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी

रामने ऑनलाईन आधार अपडेट कसं केलं?

राम सर्वात आधी UIDAI च्या वेबसाइटवर गेला. तिथे त्याने Update Aadhaar Online हा पर्याय निवडला. त्यानंतर, आधार क्रमांक आणि ओटीपी पडताळणी पूर्ण केली. नंतर त्याने त्याच्या नवीन पत्त्याचा पुरावा आणि मोबाईल नंबरची माहिती दिली. 50 रुपये फी ऑनलाइन भरली आणि रिक्वेस्ट सबमिट केली. फक्त 7 दिवसांत त्याचं आधार कार्ड अपडेट करुन त्याला मिळालं. रामला घरबसल्याच मोबाईल नंबर आणि पत्ता अपडेट करुन मिळाल्याने तो खुश झाला. 

हे ही वाचा: Personal Finance: 50,000 रुपये पगार असलेली लोकंही बनू शकतात करोडपती, फक्त 300...

श्यामला त्याचा फोटो आणि बायोमेट्रिक अपडेट करायचं होतं. 

कोणते अपडेट फक्त ऑफलाइन आधार सेवा केंद्रातच केले जातात?

1. नावात मोठे बदल ( आडनाव किंवा संपूर्ण नाव) 
2. जन्मतारखेत मोठा बदल
3. फोटो अपडेट
4. बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन) 

श्यामने ऑफलाइन अपडेट कसे केले?

श्याम त्याच्या जवळच्या आधार सेवा केंद्रात गेला. आधार अपडेट फॉर्म भरला आणि ओळखपत्र दिले. त्याने एक नवीन फोटो काढला आणि पुन्हा फिंगरप्रिंट स्कॅन केले. त्यानंतर त्याने 100 रुपये फी भरली आणि Update Request Number(URN) मिळाला. त्याचे आधार १० दिवसांत अपडेट झाले. श्यामला थोडा वेळ लागला, पण शेवटी त्याने त्याचे अपडेट योग्यरित्या करुन घेतले.

आधार अपडेट करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत?

ऑनलाइन अपडेट नाकारल्यास काय करावे?

1. चुकीच्या कागदपत्रांमुळे तुमचे आधार कार्ड नाकारले? एक नवीन कागदपत्र अपलोड करा.
2. माहिती चुकीची भरली? ते दुरुस्त करा आणि पुन्हा अर्ज करा.
3. वारंवार नाकारले जात आहात? आधार सेवा केंद्रात जा आणि ते ऑफलाइन अपडेट करा.

हे ही वाचा: कामाची बातमी: PAN 2.0 हे नवं पॅन कार्ड आहे तरी काय, सरकारला का करावं लागलं लाँच?

आधार अपडेट स्टेटस कसं कळेल?

UIDAI च्या वेबसाइटवर जा. Check Aadhaar Update Status पर्याय निवडा. तुमचा अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) एंटर करा आणि स्टेटस तपासा.

आधार अपडेट करण्यासाठी किती वेळ लागतो?

1. ऑनलाइन अपडेट: 5 ते 7 दिवस
2. ऑफलाइन अपडेट: 10 ते 15 दिवस

रामला ऑनलाइन अपडेट करणे सोपे वाटले, तर श्यामला अपडेट करण्यासाठी आधार सेवा केंद्रात जावे लागले. पण आता त्या दोघांचेही आधार कार्ड पूर्णपणे अपडेट झाले होते आणि भविष्यात त्यांना कोणत्याही सरकारी कामात कोणतीही अडचण येणार नव्हती. जर तुम्हालाही तुमचा आधार अपडेट करायचा असेल, तर इथे दिलेल्या माहितीला फॉलो करा आणि अनावश्यक त्रास टाळा!

    follow whatsapp