Gold-Silver Rate : सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. देशात सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याची मागणी वाढली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणूनही सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. अशावेळी आजचे (रविवार, 25 ऑगस्ट) सोन्याचे भाव जाणून घेऊयात. (gold-silver prices decreased today 24 august 2024 gold rate in mumbai pune for 10 gram)
ADVERTISEMENT
मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत तेजी-मंदी नोंदवली जात आहे. अलीकडेच अर्थसंकल्पानंतर सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली होती, पण जागतिक घडामोडींमुळे पुन्हा एकदा सोने भाव खाऊ लागले.
हेही वाचा : "पंतप्रधानांनी आधी आमच्या दीदींना सुरक्षा द्यावी, नंतर..."; 'लखपती दीदी' मेळाव्यापूर्वी संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Goodreturns वेबसाइटनुसार, कालच्या तुलनेत (24 ऑगस्ट) आज सोन्याच्या भावात कोणताही बदल झालेला नाही आहे. पण या किंमती खूपच जास्त आहेत. 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याची किंमत 73,040 रूपये आहे. त्याचवेळी, एक किलो चांदीचा भाव 88,000 रूपयांवर पोहोचला आहे.
तुमच्या शहरात 1 तोळा सोन्याचा भाव काय?
मुंबई
-
10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 950 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73, 040 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 780 रूपये आहे.
पुणे
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 950 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73, 040 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 780 रूपये आहे.
नागपूर
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 950 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73, 040 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 780 रूपये आहे.
नाशिक
- 10 ग्रॅम (1 तोळा) 22 कॅरेट सोन्याचा भाव 66, 980 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 24 कॅरेट सोन्याचा भाव 73, 070 रूपये आहे.
- 10 ग्रॅम (1 तोळा) 18 कॅरेट सोन्याचा भाव 54, 810 रूपये आहे.
22 आणि 24 कॅरेट सोन्यामधील फरक काय?
सोन्याची शुद्धता प्रामुख्याने कॅरेट (K) मध्ये मोजली जाते. दागिन्यांच्या तुकड्यामध्ये किंवा सोन्याच्या वस्तूमध्ये किती शुद्ध सोने समाविष्ट आहे हे कॅरेट प्रणाली दर्शवते. भारतातील सर्वात लोकप्रिय कॅरेट मूल्ये 24, 22, 18 आणि 14 आहेत. शुद्ध सोने 24k मानले जाते, ज्यामध्ये 99.9% सोने असते, तर उर्वरित कॅरेटमध्ये तांबे किंवा चांदीसारख्या मिश्र धातुंचा समावेश होतो.
हेही वाचा : Maharashtra Weather: मुंबईत पावसाची दमदार हजेरी! 'या' जिल्ह्यांना IMD कडून रेड अलर्ट जारी
22 कॅरेट सोने, चांदी, निकेल, जस्त आणि तांबे यासह इतर मिश्रधातूंचे दोन भाग एकत्रित करणारे सोन्याचे मिश्रण आहे. 22 कॅरेट सोने हे 24 कॅरेट सोन्यानंतरचे सर्वोत्तम दर्जाचे आहे. तर, 24 कॅरेट सोने हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांना किंवा ज्वेलर्ससाठी उपलब्ध असलेले सर्वात शुद्ध सोने आहे. 24-कॅरेट सोन्यामध्ये तांबे, निकेल, जस्त किंवा चांदी यांसारख्या मिश्र धातुंसह 99.99% सोने असते.
ADVERTISEMENT